Prashant Kishor : प्रशांत किशोर यांची ‘रणनीती’ पहिल्याच परीक्षेत फसली; उमेदवार निवडीतच घोडचूक

Bihar Bypolls Tarari Constituency : बिहारमध्ये काही जागांसाठी पोटनिवडणूक होणार असून प्रशांत किशोर यांनी उमेदवार देणार असल्याचे यापूर्वीच जाहीर केले आहे.
Prashant Kishor
Prashant KishorSarkarnama
Published on
Updated on

Patna News : राजकीय रणनीतीकार म्हणून ओळखले जाणारे प्रशांत किशोर हे राजकारणातील पहिल्याच परीक्षेत फेल झाले आहेत. बिहारमधील पोटनिवडणुकीत त्यांची रणनीती फसल्याचे दिसते. त्यांच्या जन सुराज पक्षाने सर्व जागांसाठी उमेदवार जाहीर केले होते. पण एका जागेवरील उमेदवार निवडीत घोडचूक झाल्याचे समोर आले आहे.

जन सुराज पक्षाकडून तरारी विधानसभा मतदारसंघातून निवृत्त लेफ्टनंट जनरल श्रीकृष्ण सिंह यांना उमेदवारी जाहीर केली होती. पण त्यांचे मतदारयादीत नावच नसल्याचा समोर आले आहे. त्यानंतर मतदारयादीत नावनोंदणीसाठी धावपळ सुरू करण्यात आली. पण तोपर्यंत नोंदणी बंद झाली होती. त्यामुळे पक्षाला आता उमेदवार बदलण्याची नामुष्की आली आहे.

Prashant Kishor
Pappu Yadav : आ रहा हूं मुंबई, सबको औक़ात बताएंगे! पप्पू यादव यांचे कुणाला चॅलेंज?

प्रशांत किशोर यांच्याकडून मंगळवारी नव्या उमेदवाराची घोषणा केली जाणार आहे. त्यांच्या पक्षाची ही पहिलीच निवडणूक असून उमेदवाराची निवडच फसल्याने निवड प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. तसेच हा प्रशांत किशोर यांच्यासाठीही मोठा झटका मानला जात आहे.

2025 च्या बिहार विधानसभा निवडणुकीआधी तरारी, बेलगांज, इमामगंज आणि रामगढ या मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकीत आपला पक्ष छाप सोडेल, असे प्रशांत किशोर यांनी म्हटले होते. पण चार उमेदवार निवडतानाच पक्षाच्या रणनीतीची पोलखोल झाली आहे.

Prashant Kishor
Election Update : आता निवडणूक लढण्यासाठी मुलांच्या संख्येची अट बदलणार; कोण करतंय नवा कायदा?

दरम्यान, बिहारमध्ये चार जागांसाठी 13 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होईल. प्रशांत किशोर यांनी काही दिवसांपूर्वीच आपल्या पक्षाची स्थापना केली आहे. यावेळी त्यांनी जनतेतूनच उमेदवारांची निवड केली जाईल, असे जाहीर केले होते. त्यानंतर त्यांनी पोटनिवडणुकीत तसा प्रयत्न केला. हा प्रयत्न फसल्याचे दिसते. एक उमेदवार बदलण्याच नामुष्की त्यांच्यावर ओढवल्याने राज्यभर चर्चा होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com