Political News : पत्नी-मुलाकडून मारहाण, जेवण देत नाहीत! माजी मंत्र्यांच्या आरोपाने खळबळ

Vishvendra Singh : विश्वेंद्र सिंह हे राजघराण्यातील आहेत. त्यांच्या कुटुंबात मागील काही वर्षांपासून संपत्तीचा वाद सुरू आहे. आता सिंह यांनी थेट न्यायालयात धाव घेतल्याने हा वाद चव्हाट्यावर आला आहे.
Vishvendra Singh, Divya Singh, Anirudh Singh
Vishvendra Singh, Divya Singh, Anirudh SinghSarkarnama

Rajasthan News : वडिलोपार्जित संपत्तीवरून कुटुंबात अनेकदा वाद होतात. हे वाद कोर्टात जातात. ‘घरोघरी मातीच्या चुली’, या म्हणीप्रमाणे या वादातून राजघराणीही सुटली नाहीत. असा एक प्रकार समोर आला आहे. (Political News) राजस्थानातील भरतपूरमध्ये काही वर्षांपर्यंत राजघराणे असलेल्या परिवारातील संपत्तीचा वाद समोर आला आहे. गेहलोत सरकारीमधील काँग्रेसचे माजी मंत्र्यांनी थेट पत्नी आणि मुलावर गंभीर आरोप केले आहेत. हे दोघे आपल्याला मारहाण करतात, पोटभर जेवण देत नाहीत, असा आरोप सिंह यांनी केला आहे.

सिंह (Vishvendra Singh) यांनी उदयपूरमधील उपखंड अधिकाऱ्यांच्या लवादाला पत्र लिहिले आहे. यामध्ये त्यांनी आपल्याला पत्नी दिव्या सिंह (Divya Singh) आणि मुलगा अनिरुध्द सिंह (Aniruddha Singh) यांच्याकडून खानपानासाठी दरमहा पाच लाख रुपये मिळावेत, अशी मागणी केली आहे. पती-पत्नी पोटभर जेवण देत नसल्याने आपण घर सोडल्याचेही त्यांनी पत्रात लिहिले आहे. (Rajasthan News Udate)

Vishvendra Singh, Divya Singh, Anirudh Singh
Yogendra yadav News : लोकसभा निवडणुकीत भाजपला मिळणार इतक्या जागा; योगेंद्र यादवांचा मोठा दावा

आपण ज्येष्ठ नागरिक असून हृद्यरोगाने पिडीत आहोत. दोन स्टेंट टाकण्यात आल्याने टेन्शन सहन करू शकत नाही. 2021-22 मध्ये दोनदा कोरोनाची लागण झाली. त्यावेळी पत्नी आणि मुलाने मदत केली नाही. फोनवरही बोलले नाहीत. वडिलांच्या मृत्युपत्राच्या माध्यमातून मिळालेल्या संपत्तीची संपूर्ण मालकी आपल्याकडे असल्याचा दावाही सिंह यांनी पत्रात केला आहे. (Congress News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पत्नी व मुलावर गंभीर आरोप करताना सिंह यांनी म्हटले आहे की, पत्नी आणि मुलाने माझे कपडे फाडून विहीरीत फेकले. अनेक कपडे जाळले. शिव्या देऊन खोलीतून सामान बाहेर फेकले. खाणे-पिणे बंद केले. मतदारसंघातून येणाऱ्या लोकांना भेटू दिले जात नव्हते. परवानगीशिवाय बाहेर जाणे बंद केले होते. दोघांकडून मारहाण केली जात होती, असा आरोपही सिंह यांनी केला आहे. (Latest Marathi News)

सध्या कधी सरकारी निवास तर कधी हॉटेलमध्ये राहत असल्याचे सिंह यांनी म्हटले आहे. भरतपूरमध्ये गेल्यानंतर घरा येऊ दिले जात नाही. घरामध्ये कोट्यवधी रुपयांच्या वस्तू आहेत. लाखो रुपयांचे दागिने आहे. पत्नीकडे आपण दिलेले 25 लाखांचे दागिने असल्याचा दावाही सिंह यांनी केला आहे.

दरम्यान, अनिरुध्द सिंह यांनी आरोप फेटाळून लावले आहेत. ते म्हणाले, एसडीएम कोर्टाचा निकाल लवकरच लागणार आहे. त्यावर दबाव टाकण्यासाठी वातावरण तयार केले जात आहे. विश्वेंद्र सिंह यांनी दोन महिन्यांपुर्वीच एसडीएम कोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. आमच्याकडून सर्व सत्य माहिती कोर्टाला देण्यात आली आहे. त्यानुसार निष्पक्ष निर्णय होईल.   

Vishvendra Singh, Divya Singh, Anirudh Singh
Election Commission News : 8 राज्ये, 49 मतदारसंघ, 8.95 कोटी मतदार..! पाचव्या टप्प्याची ही आहेत वैशिष्टये...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com