बेळगाव : संभाव्य बंडखोरीच्या तयारीत असलेल्या आणि भाजप (BJP) आणि काॅग्रेसमधील (Congress) नाराज उमेदवार धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या (धजद) संपर्कात आहेत. त्यापैकी दोघांनी आतापर्यंत धजदचे माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी (H. D. Kumarswami) यांची भेट घेतली असून, येत्या १४ एप्रिलला बंगळूरला पक्षाचा मेळावा आयोजित केला आहे. तेथे जिल्ह्यामधील नेते धजदमध्ये प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे. या दरम्यान उमेदवारीही जाहीर करण्याची दाट शक्यता आहे. (Potential rebels of Congress and BJP took H. D. Kumarswami's visit)
कर्नाटक (Karnataka) विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केली जात आहे. मात्र, राष्ट्रीय पक्षामधील नाराज आणि संभाव्य बंडखोरी किंवा अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याची तयारी करत आहेत. उमेदवारांपैकी काहींनी धजदशी संपर्क वाढविला आहे. गेले काही दिवस धजदतर्फे वेट ॲंड वॉचची भूमिका घेण्यात आली आहे. प्रभावी उमेदवारांचा शोध पक्षातर्फे सुरु आहे. त्याचाच भाग म्हणून बेळगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. प्रभू यत्नट्टी धजदच्या संपर्कामध्ये आहेत, अशी माहिती आहे.
ॲड. यत्नट्टी यांनी कॉंग्रेस पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली आहे. मात्र, त्यांना उमेदवारी मिळते किंवा नाही, हे अद्याप स्पष्ट नाही. मात्र, पर्याय उमेदवारांना पक्ष झुकते माप देत आहे, हे ओळखून ॲड. यत्नट्टी धजदच्या संपर्कात असल्याचे मानले जाते. बेळगाव दक्षिण मतदार संघातून धजद उमेदवारीवर निवडणूक लढविण्याची शक्यता आहे.
बेळगाव दक्षिणमध्ये भाजपकडून आमदार अभय पाटील यांना परत उमेदवारी घोषित होण्याची शक्यता आहे, तर कॉंग्रेसकडून विविध पर्याय खुले आहेत. त्यापैकी कोणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडते, हे पाहावे लागणार आहे. यात यत्नट्टी यांनी धजदमध्ये प्रवेश केल्यास या ठिकाणी चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे.
सौदत्ती मतदार संघातून काॅंग्रेसने विश्वास वैद्य यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यामुळे गौतम चोप्रा नाराज आहेत. बंडखोरीच्या तयारीत असून, अलिकडे त्यांनीही धजदशी संपर्क साधल्याची माहिती आहे. कित्तूरला डी. बी. इनामदार यांच्या स्नूषा लक्ष्मी, निपाणीत उत्तम पाटीलही धजदच्या संपर्कात असल्याची माहिती आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.