Delhi Bibhav Kumar News, 18 May : 'आप'च्या खासदार स्वाती मालीवाल मारहाण प्रकरणानं दिल्लीचं राजकारण तापलं आहे. स्वाती मालीवाल यांना अरविंद केजरीवाल यांचे माजी खासगी सचिव विभव कुमार ( Bibhav Kumar ) यांनी बेदम मारहाण केली होती. याप्रकरणी विभव कुमार यांच्यावर दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यावर ते फरारी झाले होते. पण, आता दिल्ली पोलिसांनी विभव कुमार यांना अटक केली आहे. त्यादिवशी नेमकं काय घडलं? कोणत्या कारणावरून मारहाण केली? हे समोर येण्याची शक्यता आहे.
विभव कुमार यांना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ( Arvind Kejriwal ) यांच्या निवासस्थानावरून अटक केली आहे. त्यांना पोलिस सिविल लाइन पोलिस ठाण्यात घेऊन गेली आहे. विभव कुमार हे दिल्लीच्या बाहेर गेले नसून मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या निवासस्थानी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
विभव कुमार यांनी शुक्रवारी स्वाती मालीवाल ( Swati Maliwal ) यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. कुमार यांनी ई-मेलद्वारे पोलिसांना तक्रार पाठवलेली. हा ई-मेल पोलिसांनी ट्रॅक केला. शेवटी विभव कुमार मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या निवासस्थानी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि त्यांना ताब्यात घेण्यात आलं.
13 मे ला स्वाती मालीवाल यांना मारहाण झाल्याची घटना समोर आली होती. त्यांनी केजरीवाल यांचं खासगी सचिव विभव कुमार यांच्यावर गंभीर आरोप करत गुन्हा दाखल केला होता. यानंतर शुक्रवारी मालीवाल यांनी न्यायालयासमोर आपलं जबाब नोंदवला. गुन्हा दाखल झाल्यानंतर विभव कुमार फरारी झाले होते. पोलिस त्यांच्या मागावर होती.
मालीवाल यांनी काय केले आरोप?
"विभव कुमार यांनी आपल्याला मारहाण केली. सात-आठ चापट मारल्या. शर्ट ओढला, मासिक पाळी सुरू असल्याचं सांगूनही पोटात लाथा मारल्या," असे गंभीर स्वाती मालीवाल यांनी केले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.