Prajwal Revanna News : भारतात येण्याआधीच प्रज्वल रेवण्णांनी उचललं 'हे' पाऊल ; आईने ठोठवला कोर्टाचा दरवाजा!

Prajwal Revanna Case : प्रज्वल रेवण्णा 31 मे रोजी परदेशातून बंगळुरूमध्ये पोहचणार आहेत आणि त्यानंतर तत्काळ एसआयटी त्यांना अटक करणार आहे.
Prajwal Revanna
Prajwal RevannaSarakarnama

Prajwal Revanna Latest update :  कर्नाटकातील चर्चित अश्लील व्हिडिओ प्रकरणातील आरोपी आणि हासनचे खासदार प्रज्वल रेवण्णा यांनी बंगळुरू सेशन कोर्टात अंतरिम जामिनासाठी याचिका दाखल केली आहे. प्रज्वल रेवण्णाचा जामीन अर्ज न्यायालयात त्यांची आई भवानी रेवण्णा यांच्यावतीने दाखल करण्यात आला.

लैंगिक शोषणाचे आरोप झालेले प्रज्वल रेवण्णा 31 मे रोजी परदेशातून बंगळुरूमध्ये पोहचणार आहेत. असं सांगितलं जात आहे की, प्रज्वलचे विमान सकाळी आठ वाजता बंगळुरु विमानतळावर उतरणार आहे. जसं रेवण्णा विमानतळावर पोहचतील, तसं या प्रकरणाच्या तपासासाठी बनवण्यात आलेली एसआयटी त्यांना अटक करणार आहे.

Prajwal Revanna
Prajwal Revanna News : 'मी 31 मे रोजी SIT समोर येणार' ; महिनाभरानंतर पहिल्यांदाच प्रज्ज्वल रेवण्णाचं विधान समोर!

प्रज्वल रेवण्णाने 27 मे रोजी एक व्हिडिओ मेसेज जारी करून म्हटले होते की, ते 31 मे रोजी परत येत आहेत. शिवाय अश्लील व्हिडिओ प्रकरण हे माझ्याविरोधातील षडयंत्र असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. त्यांनी हेही म्हटले की ते परदेशात जाताच हे प्रकरण सुरू करण्यात आलं आणि मतदानाच्या दिवशी 26 एप्रिल रोजी याची काहीच चर्चा नव्हती.

जेडीएस खासदार प्रज्जवल रेवण्णानी (Prajwal Revanna) एक व्हिडिओ संदेश जारी करत म्हटले की, ' जेव्हा 26 एप्रिल रोजी निवडणूक झाली, तेव्हा माझ्याविरोधात कोणतेही प्रकरण नव्हते आणि कोणतीही SIT बनली नव्हती, माझा परदेश दौरा नियोजित होता. मला आरोपांबाबत तेव्हा समजले, जेव्हा मी माझ्या प्रवासात होतो.'

राहुल गांधी(Rahul Gandhi) आणि अनेक अन्य काँग्रेस नेत्यांनी याबाबत व माझ्याविरोधात बोलणं सुरू केले. माझ्याविरोधात एक राजकीय षडयंत्र रचलं गेलं. शुक्रवारी 31 मे रोजी सकाळी 10 वाजता मी एसआयटी समोर हजर होवून, तपासाशी निगडीत सर्व माहिती देईन. मी तपासात सहकार्य करेन, माझा न्यायपालिकेवर विश्वास आहे.' असं रेवण्णांनी म्हटलं आहे.

Prajwal Revanna
Prajwal Revanna News : प्रज्वल रेवण्णाने भारतात पाऊल ठेवताच..! ‘त्या’ व्हिडिओनंतर SIT लागली कामाला  

एच. डी. देवेगौडांसह माजी मुख्यमंत्री मुख्यमंत्री कुमारस्वामी (HD Kumaraswamy) यांनीही प्रज्ज्वल यांना भारतात परत येण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर त्यांनी सोमवारी आपण 31 तारखेला भारतात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर ते परदेशात पळून गेल्याची चर्चा होती. पण आपला नियोजित दौरा होता, असे त्यांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com