Prajwal Revanna News : 'मी 31 मे रोजी SIT समोर येणार' ; महिनाभरानंतर पहिल्यांदाच प्रज्ज्वल रेवण्णाचं विधान समोर!

Prajwal Revanna Case : '26 तारखेला जेव्हा मतदान झाले, त्या दिवसापर्यंत कोणाला माझ्यावर संशय आला नव्हता. तसेच, माझा परदेश दौरा नियोजित होता. मला आरोपांबाबत तेव्हा समजले, जेव्हा मी माझ्या प्रवासात होतो, असंही म्हटलं आहे.
Prajwal Revanna
Prajwal RevannaSarakarnama
Published on
Updated on

Prajwal Revanna Latest update : लैंगिक शोषणाच्या आरोपांचा सामना करत असलेले 'जेडीएस'मधून निलंबित झालेले खासदार प्रज्ज्वल रेवण्णाने, प्रकरण समोर आल्याच्या एक महिन्यानंतर म्हटले की ते भारतात परततील आणि 31 मे रोजी विशेष तपास पथका(SIT) समोर येतील. खरंतर या प्रकरणी प्रज्ज्वल रेवण्णाच्या पक्षाकडून किंवा कुटुंबाकडून तत्काळ कोणतीही पुष्टी करण्यात आलेली नाही.

जेडीएस खासदार प्रज्जवल रेवण्णांने(Prajwal Revanna) एक व्हिडिओ संदेश जारी करत म्हटले की, ' जेव्हा 26 एप्रिल रोजी निवडणूक झाली, तेव्हा माझ्याविरोधात कोणतेही प्रकरण नव्हते आणि कोणतीही SIT बनली नव्हती, माझा परदेश दौरा नियोजित होता. मला आरोपांबाबत तेव्हा समजले, जेव्हा मी माझ्या प्रवासात होतो.'

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Prajwal Revanna
Congress News : पंतप्रधान मोदींच्या 'या' बालेकिल्ल्यात काँग्रेस करणार जोरदार शक्तिप्रदर्शन!

राहुल गांधी(Rahul Gandhi) आणि अनेक अन्य काँग्रेस नेत्यांनी याबाबत व माझ्याविरोधात बोलणं सुरू केले. माझ्याविरोधात एक राजकीय षडयंत्र रचलं गेलं. शुक्रवारी 31 मे रोजी सकाळी 10 वाजता मी एसआयटी समोर हजर होवून, तपासाशी निगडीत सर्व माहिती देईन. मी तपासात सहकार्य करेन, माझा न्यायपालिकेवर विश्वास आहे.'

प्रज्ज्वलच्या व्हिडिओ मेसेजमध्ये आणखी काय? -

प्रज्ज्वल रेवण्णाने आपल्या मेसेजच्या सुरुवातीस म्हटले की, 'सर्वांना नमस्कार, सर्वात आधी माझे आई-वडील, माझे आजोबा, माझे कुमार अण्णा, देशाची जनता आणि जेडीएसच्या सर्व कार्यकर्त्यांची मी माफी मागतो. मी परदेशात आहे. मला योग्य माहिती दिली गेली नाही, मी इथे 26 तारखेची निवडणूक झाल्यानंतर सर्व माहिती देण्यासाठी आलो आहे.'

Prajwal Revanna
Amit Shah Vs Sharad Pawar : 'शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना आमच्यापासून तोडलं...'; अमित शाहांचा गंभीर आरोप !

याशिवाय रेवण्णांनी आपल्या संदेशात म्हटले की, '26 तारखेला जेव्हा मतदान झाले, त्या दिवसापर्यंत कोणाला माझ्यावर संशय आला नव्हता. अशाप्रकारचे कोणते प्रकरण किंवा घटना समोर आली नव्हती आणि कोणती एसआयटीही(SIT) गठित करण्यात आली नव्हती. माझा परदेश दौरा आधीपासूनच नियोजित होता. अशावेळी मी 3-4 दिवासानंतर परदेश दौऱ्यावर गेलो. जेव्हा मी यूट्यूब आणि वृत्तवाहिन्या बघितल्या तेव्हा मला या प्रकरणाची माहिती मिळाली. जेव्हा मला एसआयटीने नोटीस पाठवली तेव्हा वकिलामार्फत याचे उत्तर पाठवलं गेलं.'

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com