Prajwal Revanna Sex Scandal : प्रज्वल रेवण्णा सेक्स स्कँडल प्रकरणात ट्विस्ट; 31 मेला एसआयटी समोर होणार हजर

SIT : माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. माझ्यावर खोटे खटले आहेत. माझा कायद्यावर विश्वास आहे, असे प्रज्वल याने आपल्या निवदेनात म्हटले आहे.
Prajwal Revanna
Prajwal RevannaSarkarnama

Prajwal Revanna Sex Scandal : देशभर गाजत असलेल्या कर्नाटक सेक्स स्कँडल प्रकरणा एसआयटीची स्थापना करण्यात आली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी जेडीयूचे विद्यमान खासदार प्रज्वल रेवण्णा परदेशात असल्याने चौकशी कशी होणार, याची शंका व्यक्त केली जात होती. एसआयटीने रेवण्णा याला नोटीस बजावली होती. त्यानंतर प्रथमच विदेशातून व्हिडिओ संदेशाच्या माध्यमातून प्रज्वल रेवण्णा यांनी एसआयटी समोर हजर राहणार असल्याचे सांगितले आहे.

कर्नाटक सेक्स स्कँडल प्रकरण मुख्य आरोपी प्रज्वल रेवन्ना Prajwal Revanna हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर फरार होता. मात्र आता एसआयटी चौकशीसाठी हजर राहणार असल्याने निवेदन प्रज्वल रेवण्णा याने दिले आहे. 31 मे रोजी सकाळी 10 वाजता एसआयटीसमोर उपस्थित राहून मी सहकार्य करणार, असे देखील आपल्या निवेदनात रेवण्णाने नमूद केले आहे.

Prajwal Revanna
Rahul Gandhi News : राहुल गांधी येताच स्टेज कोसळला; मीसा भारतींनी दिला हात...

माझा न्यायव्यवस्थेवर Judiciary विश्वास आहे. माझ्यावर खोटे खटले आहेत. माझा कायद्यावर विश्वास आहे, असे प्रज्वल याने आपल्या निवदेनात म्हटले आहे. तसेच माझ्याविरोधात राजकीय षडयंत्र रचले गेले असल्याचा आरोप देखील प्रज्वल रेवण्णा याने केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!

व्हिडिओद्वारे संदेश

प्रज्वल रेवण्णाद्वारे व्हिडिओद्वारे आपले म्हणणे मांडले आहे. निवडणूक होईपर्यंत 26 एप्रिलपर्यंत सर्व ठीक होते. मात्र, मी परदेशात गेल्यानंतर चार पाच दिवसांनी हे सगळे सुरु झाले.हसनमध्ये माझ्या विरोधात काही शक्ती कार्यरत आहेत. कारण मी राजकीयदृष्ट्या पुढे जात आहे. युट्यूब तसेच न्यूज चॅनेलद्वारे मला माझ्यावर होणाऱ्या आरोपांच्या बाबत माहित झाले. मला नोटीस मिळाली. मी माझ्या वकिलांच्या मार्फेत उत्तर दिले आहे.

Prajwal Revanna
Porsche Hit And Run Case : कल्याणीनगर अपघातप्रकरणी अटक डॉ. तावरेंनी वाढविले टेन्शन, म्हणाले मी सर्वांची नावे घेणार..!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com