Prakash Ambedkar News : ठाकरेंना त्रास द्यायचाय का? प्रकाश आंबेडकर, दीपक केसरकारांना काय म्हणाले?

Deepak Kesarkar News : शिवसेना शिंदे गटाते मंत्री दीपक केसरकर आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची दिल्लीत भेट झाली.
Prakash Ambedkar met Deepak Kesarkar
Prakash Ambedkar met Deepak KesarkarSarkarnama
Published on
Updated on

Prakash Ambedkar met Deepak Kesarkar In Delhi : शिवसेना शिंदे गटाते मंत्री दीपक केसरकर आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची दिल्लीत भेट झाली. दिल्लीतील महाराष्ट्र सदनात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. या दोन्ही नेत्यांमधील संवादामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ही सदिच्छा भेट असल्याचे दोन्ही नेत्यांनी यावेळी स्पष्ट केले.

प्रकाश आंबेडकर आणि दीपक केसरकरांची ही भेट कॅमेऱ्यात टिपली गेली. त्याचबरोबर या दोन्ही नेत्यांतील संभाषणही रेकॉर्ड झाले. केसरकर येत असतानाच समोरून प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) आले. त्यांनी यावेळी केसरकरांना नमस्कार केला आणि हस्तांदोलन केले.

Prakash Ambedkar met Deepak Kesarkar
Shivsena News : शंभूराज देसाईंच्या मतदारसंघात उद्या संजय राऊतांची तोफ धडाडणार

केसरकरांना (Deepak Kesarkar) बघून प्रकाश आंबेडकर त्यांना हसत-हसत म्हणाले, उद्धव ठाकरेंना त्रास द्यायचाय का? यावर केसरकर यांना हसू आवरता आले नाही. प्रकाश आंबेडकरांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा झाली.

शिवसेना ठाकरेगटाने वंचित बहुजन आघाडीसोबत युती करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर नेत्यांनी मुंबईत संयुक्त पत्रकारपरिषद घेत युतीची घोषणा केली होती. आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने ठाकरे गट आणि वंचितची युती गेमचेंजर ठरू शकते, असे बोलले जाते.

Prakash Ambedkar met Deepak Kesarkar
Satara News : उदयनराजे, शिवेंद्रराजे वादावर बावनकुळे म्हणाले, ही भाजपची संस्कृती नाही...

दरम्यान, यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी झालेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीवरही भाष्य केले. आंबेडकर म्हणाले, विरोधी पक्षांची बैठक चांगली झाली. किमान समान कार्यक्रम जर ठरला तर विरोधक एकत्र येवू शकतात. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या काळात किमान समान कार्यक्रमावर अनेक पक्ष एकत्र आले होते, असेही आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com