Bihar Assembly Election News : प्रशांत किशोर यांची बिहार विधानसभा निवडणुकीबाबत मोठी घोषणा, म्हणाले...

Prashant Kishor Vs Lalu Prasad Yadav, Nitish Kumar : नितीश कुमार आणि लालू प्रसाद यादव यांच्यावर निशाणा साधला आहे, जाणून घ्या काय म्हटले आहे?
Prashant Kishor Vs Lalu Prasad Yadav, Nitish Kumar
Prashant Kishor Vs Lalu Prasad Yadav, Nitish KumarSarkarnama

Prashant Kishor contest Bihar assembly elections : बिहारमध्ये जन सुराज पदयात्रा काढून राजकीय वातावरण ढवळून काढणारे आणि बहुचर्चित राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांनी आगामी विधानसभा निवडणूक लढणार असल्याची घोषणा केली आहे. प्रशांत किशोर उर्फ पीके म्हणाले की, जेव्हा ते निवडणूक लढवतील तेव्हा आरजेडी अध्यक्ष लालू यादव आणि जेडीयू अध्यक्ष नितीश कुमार यांच्या सारख्या नेत्यांचं टेंशन वाढेल.

याशिवाय प्रशांत किशोर(Prashant Kishor) यांनी यावेळी हेही स्पष्ट केले की, मला धक्का देण्या इतकी त्यांच्यात हिंमत नाही. बिहारमध्ये पदयात्रा करत असलेल्या प्रशांत किशोर यांनी म्हटले की, जर त्यांनी जन सुराज व्यवस्था बनवली नाही, तर उद्या समाजातील लोक बोलतील की प्रशांत किशोर गावा-गावात केवळ फिरत आहे, त्यांची तर काहीच ताकद नाही. मला नितीश कुमार आणि लालू प्रसाद यादव धक्का देऊ शकत नाही.

Prashant Kishor Vs Lalu Prasad Yadav, Nitish Kumar
Narendra Modi Swearing Ceremony : मोठी बातमी! नरेंद्र मोदी 8 जूनला शपथ घेणार नाहीत

त्यांनी म्हटलं, मी जर बिहारमध्ये लढण्यासाठी आलो आहे तर, एवढ्या ताकतीनिशी लढेन की या सर्व नेत्यांना जोरदार तडाखा देईन. पश्चिम बंगालमध्ये तुम्ही माझं काम बघितलंच असेल, की मीच त्यांना हैराण करून सोडलं होतं. समाजात असे अनेक लोक आहे, जे निवडणूक लढण्यासाठी भांडतात. आम्ही त्यातील नाही आहोत.

Prashant Kishor Vs Lalu Prasad Yadav, Nitish Kumar
Bihar CM Nitish Kumar : नितीशबाबूंचे मोदी-शाहांवर प्रेशर; दिल्लीत ‘अग्नी’ भडकणार

आम्ही बिहारचे पुत्र आहोत, देशभरातील नेते जेव्हा निवडणूक लढवतात तेव्हा माझ्याकडूनच सल्ला घेतात. मग हे नेते माझं काय नुकसना करतील? एकदा जर समाजातील लोक उभा ठाकले तर मग जनतेच्या ताकदीसमोर दुसरी कोणतीच ताकद टिकू शकत नाही.

जिंकण्याची रणनिती सुद्धा डोक्यात ठेवून आलो आहे -

जर निवडणूक लढण्यासाठी आलोच आहे तर, हे लक्षात घ्या की जिंकण्याची रणनिती सुद्धा डोक्यात ठेवून आलो आहे. विचारपूर्वकच आलो आहे, हे कठीण काम आहे. हे करण्यासाठी किती ताकद लावावी लागेल, किती घाम गाळावा लागेल, किती व्यवस्था बनवावी लागेल आणि किती यंत्रणा उभारावी लागले. सर्व विचारपूर्वक व्यवस्था बनवण्यासाठी बिहारला आलो आहे. प्रशांत किशोर पुढे म्हणाले, हे जेवढे नेते आहे ते असा विचार करत आहेत की, आम्ही काही करू शकणार नाही. परंतु ते गैरसमजात आहेत. आम्ही मोठमोठ्यांच्या नाकात दम आणतो.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com