Goa Assembly Session : गोव्यात दारुवर बंदी घाला ! सरकारमधील आमदाराच्या मागणीनं मुख्यमंत्र्यांचं टेन्शन वाढलं

Gao Liquor : गोव्यात मद्य उत्पादन करावे मात्र त्याच्या सेवनावर बंदी घालावी, अशी मागणी शेट यांनी केली.
 Pramod Sawant
Pramod SawantSarkarnama
Published on
Updated on

Goa Political News : गोव्यात मद्याच्या आहारी गेलेल्या तरुणाची संख्या वाढली आहे. काहीजणांचा अतिमद्य सेवन केल्याने मृत्यू देखील झाला. देशातील विविध राज्यांनी मद्यावर बंदी घातली, त्याचप्रमाणे गोव्यात देखील दारुवर बंदी घालावी, अशी मागणी सरकारमधीलच एका आमदाराने केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे टेन्शन चांगलेच वाढणार आहे.

गोवा Goa पावसाळी अधिवेशनाच्या बाराव्या दिवशी मागण्या आणि कपात सूचना सत्रात मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांनी याबाबत मागणी केली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे असलेल्या उत्पादन शुल्क विभाग, कोषागार आणि लेखा प्रशासन यासह विविध खात्यासंबधित मागण्यावर सत्ताधारी व विरोधी बाकावरील आमदारांनी मतं मांडली.

आमदार प्रेमेंद्र शेट यांनी राज्यात मद्य सेवन करण्यावर बंदी घालावी अशी मागणी केली. शेट यांच्या मागणीवरुन सभागृहात एकच हाशा पिकला. गोव्यात मद्य उत्पादन करावे मात्र त्याच्या सेवनावर बंदी घालावी, अशी मागणी शेट यांनी केली.

राज्यात तरुणांमध्ये मद्याच्या आहारी गेलेल्या तरुणांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे अकाली मृत्यू होणाऱ्या नागरिकांची संख्या देखील कमालीची वाढल्याचे प्रेमेंद्र शेट म्हणाले. त्यामुळे गोव्यात मद्यबंदीचा सरकारने विचार करावा असे त्यांनी सूचवले.

प्रेमेंद्र शेट यांच्या या मागणीला कुडतरीचे अपक्ष आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी विरोध दर्शवला. मद्यबंदी पेक्षा मद्य सेवनावर नियम लागू करावेत, असे लॉरेन्स यांनी सूचवले. तसेच, ऑनलाईन पद्धतीने मद्य मागवता येईल, असे काही प्रकार करु नयेत असेही लॉरेन्स म्हणाले.

 Pramod Sawant
Ayodhya Paul : बेटा तुझी माझ्याशी गाठ आहे; अयोध्या पोळ यांचा केरे पाटलांना इशारा, केले गंभीर आरोप

मद्याची किंमत कमी करा

यापूर्वी भाजप आमदार आणि माजी मंत्री निलेश काब्राल यांनी राज्यातील मद्याच्या किमती कमी करण्याची मागणी केली. गोवा पर्यटन राज्य म्हणून ओळखले जाते. पण, इतर राज्यात मोठे मद्याचे ब्रँड कमी किमतीत विकले जातात. यामुळे पर्यटक गोव्याकडे पाठ फिरवतात. याचा गोव्याच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो, त्यामुळे राज्य सरकारने मद्याच्या किमती कमी करण्याबाबत विचार करावा अशी सूचना आमदार काब्राल यांनी केलीली आहे. त्यामुळे मद्यावरून गोवा सरकारमध्ये दोन वेगळे प्रवाह असल्याचे स्पष्ट झाले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

 Pramod Sawant
Pune Rain Update : पुणेकरांनो सतर्क रहा! पुराचा धोका आणखी वाढणार; लष्कर दाखल

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com