Pune Rain Update : पुणेकरांनो सतर्क रहा! पुराचा धोका आणखी वाढणार; लष्कर दाखल

Suhas Diwase : दुपारी चारनंतर पुण्यातील पूरस्थिती वाढणार असल्याने शहरात लष्कर दाखल केल्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी सांगितले.
Suhas Diwase
Suhas DiwaseSarkarnama
Published on
Updated on

Pune Rain News : पुणे शहर आणि जिल्हाभर मुसळधार सुरू असल्याने नद्यांना पूर आला आहे. जिल्ह्यात बुधवारी रात्रीपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असल्याने पुणे शहरात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक सोसायटी आणि घरांमध्ये वस्त्यांमध्ये पाणी शिरले आहे.

पुराचा फटका बसलेल्या भागात प्रशासनाकडून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. पुढील काही तास पावसाचा जोर असाच राहण्याची शक्यता असल्याने शहरातील पूरस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासकनाकडून काही खबरदारीच्या उपाययोजना करण्यात येत आहेत.

जिल्हाधिकारी सुहास दिवसे Suhas Diwase यांनी पत्रकार परिषद घेत पुण्यातील पूर परिस्थितीबाबत माहिती दिली. सुहास दिवसे म्हणाले, आज दुपारी 12 वाजेपर्यंत 65 मिलिमीटर पाऊस झाला आहे. पुणे जिल्ह्याचा विचार करता मुळशी धरण क्षेत्रात सर्वाधिक 484 मीमी पावसाची नोंद झाली आहे.

खडकवासला धरण साखळी क्षेत्रामध्ये पाऊस वाढल्याने खडकवासला धरणातील पाण्याची पातळी वाढली असून त्यामुळे मुठा नदीमध्ये पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे पुणे शहरातील नदीलगतच्या परिसरामध्ये पाणी शिरले आहे.

पुणे महापालिका डिझास्टर मॅनेजमेंट, फायर टीम, अग्नीशामक दल यांच्याकडून रेस्क्यू ऑपरेशन करण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे सकाळपासून संपर्क करून परिस्थितीचा आढावा घेत आहेत. सध्याची परिस्थिती पाहता लष्कर आणि नौदलाशी संपर्क साधण्यात आला आहे. लष्कराच्या काही तुकड्या पुण्यामध्ये दाखल झाले आहे.

Suhas Diwase
Nana Patole Vs Devendra Fadnavis आजी-माजी गृहमंत्र्यांच्या वादात नाना पटोलेंची उडी; फडणवीसांना फटकारले, म्हणाले...

एकतानगर परिसरात पूर परिस्थिती गंभीर असून 60-70 जणांची टीम बचाव कार्य करत आहे. शिवाजीनगर, संगम वाडी परिसरात काही परिस्थिती उद्भवल्यास त्या ठिकाणी आर्मीचा एक टीम स्टॅन्ड बाय मोडवर आहे. आज दुपारनंतर 4 वाजता खडकवासला धरणातून 35 हजार क्यूसेसने पाणी सोडले जाणार आहे. तर आता 15 हजार क्यूसेसने धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. विसर्ग वाढवल्यानंतर पूर परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.

खासगी क्षेत्रातील कार्यालय आणि आस्थापनांना सुट्टी देण्याचे मुख्यमंत्र्यांचे Eknath Shinde आदेश आहेत. मात्र आपत्ती व्यवस्थापनाची निगडित सरकारी आस्थापनं सुरु राहणार आहेत. मुळशी परिसरातील लवासा सिटी या ठिकाणी एक दरड कोसळल्याची घटना पुढे आली आहे. यामध्ये तीन लोक अडकल्याची प्राथमिक माहिती आहे.

त्यामुळे सध्याची पावसाची परिस्थिती पाहता नागरिकांनी अत्यंत महत्त्वाचे काम असेल तर बाहेर पडावे अन्यथा घराबाहेर पडणे टाळावे. तसेच वाहत्या पाण्यामध्ये गाड्या घालू नयेत असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना केला आहे.

आतापर्यंत पुणे शहरातून Pune महापालिकेने 400 नागरिकांना स्थलांतरित केला आहे. तर पुणे जिल्ह्यातील अद्याप एकाही गावाचा संपर्क तुटलेला नाही. पावसाचा जोर असाच कायम राहिलास. इंद्रायणीची पातळी वाढणार आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेला देखील चेतवाणी दिलेली आहे. तसेच राज्य मार्ग 2, जिल्हा मार्ग 5, असे एकूण 7 मार्ग बंद करण्यात आले आहेत, अशी ही माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Suhas Diwase
Vijay Wadettiwar : पूरस्थितीत मदत करा, पण भेदभाव करू नका; वडेट्टीवारांचा केंद्र आणि राज्य सरकारला सल्ला

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com