Nitish Kumar : अखेर नितीश कुमारांनी हवं तेच केलं! मनीष वर्मांवर मोठी जबाबदारी...

Manish Verma JDU Assembly Election : मनीष वर्मा हे माजी आयएएस अधिकारी असून नितीश कुमार यांचे अत्यंत विश्वासू मानले जातात.
Nitish Kumar, Manish Verma
Nitish Kumar, Manish VermaSarkarnama

Patna : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे उत्तराधिकारी म्हणून निवृत्त आयएएस अधिकारी मनीष वर्मा यांच्या नावाची चर्चा आहे. त्यांनी दोन दिवसांपुर्वीच जेडीयूमध्ये प्रवेश केल्यानंतर या चर्चांना उधाण आले. त्यानंतर नितीशबाबूंनी आपल्या विश्वासू सहकाऱ्यावर पक्षात मोठी जबाबदारी दिली आहे.

मनीष वर्मा यांना जेडीयूचे राष्ट्रीय महासचिव करण्यात आले आहे. त्यामुळे आता पक्षात नितीश कुमार यांच्यानंतर वर्मा हे दुसऱ्या क्रमांकाचे नेते असतील, अशी चर्चा आहे. त्याआधी या पदावर आरसीपी सिंह होते. तेही नितीशबाबूंची अत्यंत विश्वासू नेते मानले जात होते. पण ते पक्षातून बाहेर पडल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी वर्मांना सक्रीय राजकारणात उतरलवे आहे.

जेडीयूचे अध्यक्ष म्हणून काम केलेले आरसीपी सिंह यांच्याप्रमाणे मनीष वर्माही नितीश कुमारांच्या जिल्ह्यातील आहेत. सिंह हेही माजी आयएएस अधिकारी होते. त्यांचेही नाव उत्तराधिकारी म्हणून घेतले जात होते. आता वर्मा यांचे नाव आघाडीवर आहे.

Nitish Kumar, Manish Verma
Haryana Assembly Election : मायावतींचे उत्तराधिकारी आकाश आनंद यांचा पहिला डाव; भाजपसह काँग्रेसला देणार धक्का?

वर्मा यांनी काही वर्षांपुर्वीच शासकीय सेवेतून स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. मात्र, ते सक्रीय राजकारणापासून दूर होते. असे असले तरी ते नितीश कुमार यांच्यासाठी काम करत होते. नितीश कुमारांचे ते सचिव होते. लोकसभा निवडणुकीत त्यांच्यावर 16 मतदारसंघांची रणनीती ठरवण्याची जबाबदारी देण्यात आली होती. त्यापैकी बारा जागांवर पक्षाला विजय मिळाला.

Nitish Kumar, Manish Verma
Lok Sabha Election Result : लोकसभेच्या निकालातून भाजपसह काँग्रेसलाही रेड अलर्ट!

लोकसभेतील यशानंतर नितीश कुमारांना वर्मा यांना सक्रीय राजकारणात आणले. त्यानंतर थेट राष्ट्रीय महासचिव पदावर बढती दिली. त्यामुळे पक्षातील त्यांचे महत्व चांगलेच वाढले आहे. पुढील वर्षी राज्यात विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्याआधीच संघटनात्मक बांधणी आणि निवडणुकीची व्युहरचना ठरवण्यासाठी वर्मांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. त्यामुळे त्यांना संघटनेत महत्वाचे स्थान देण्यात आल्याचे मानले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com