New Parliament News : पंतप्रधान मोदींचं स्वप्नं साकार! नवीन संसद भवनाच्या कामकाजाचा मुहूर्त अखेर ठरला; 'या' दिवशी दारं उघडणार

BJP Vs Congress : काँग्रेससह 19 विरोधी पक्षांनी संसदेच्या या नव्या इमारतीच्या उद्घाटन समारंभावर बहिष्कार टाकला होता.
Narendra Modi - New Parliament Building
Narendra Modi - New Parliament BuildingSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 28 मे 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज नवीन संसद भवनाचे उद्घाटन पार पडलं होतं. या संसद भवनाच्या उद्धघाटनावरुन राजकारण चांगलंच तापलं होतं. संसदेच्या नवीन इमारतीचं उद्घाटन भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते व्हावं, असं काँग्रेससह विरोधकांचं म्हणणं होतं.

काँग्रेससह 19 विरोधी पक्षांनी संसदेच्या या नव्या इमारतीच्या उद्घाटन समारंभावर बहिष्कार टाकला होता. यानंतर आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेली या संसद भवनाचं कामकाज केव्हापासून सुरू होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले होते. पण आता नव्या संसद भवनाच्या कामकाजासाठीचा मुहूर्त ठरला असल्याची माहिती समोर येत आहे.

Narendra Modi - New Parliament Building
Parliament Special Session : निवडणुका की अजून काही..? संसदेच्या विशेष अधिवेशनाचा उद्देश काय?

केंद्र सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील 18 ते 22 सप्टेंबर दरम्यान संसदेचं विशेष अधिवेशन(Special session of parliament) बोलावलं आहे. याची सुरुवात 18 सप्टेंबर रोजी संसदेच्या जुन्या इमारतीत होईल. दरम्यान, गणेश चतुर्थीच्या दिवशी म्हणडे 19 सप्टेंबर दिवशी अधिवेशन नव्या संसद भवनात शिफ्ट केले जाणार आहे. विशेष अधिवेशन 22 सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. विशेष अधिवेशनाचा अजेंडा समोर आला नसला तरी पण राजकीय वातावरण तापवत विरोधक मोदी सरकार घेरण्याच्य़ा तयारीत आहे.

गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर नव्या संसदेत प्रवेश केला जाणार आहे. त्यामुळे या अधिवेशनाच्या निमित्ताने नव्या संसद भवनातील कामकाजास सुरुवात केली जाणार आहे. एकीकडे विरोधकांनी केंद्र सरकारने बोलावलेल्या विशेष अधिवेशनावर गणेशोत्सवाच्या काळात अधिवेशन का ठेवले, असा सवाल करत त्यावर आक्षेप नोंदवला आहे.

Narendra Modi - New Parliament Building
Bachchu Kadu News : बच्चू कडूंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल ; बदनाम झालो पण...; शिंदे-फडणवीसांनी दिलेला शब्द पाळला..

सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्टअंतर्गत संसदेची नवीन इमारत बांधली गेलीय. या संपूर्ण प्रकल्पासाठी 20 हजार कोटी रुपये खर्च होणार आहेत. संसदेतील लोकसभेचं सभागृह राष्ट्रीय पक्षी मोराच्या थीमवर, तर राज्यसभेच्या सभागृहाची रचना राष्ट्रीय फूल कमळाच्या थीमवर करण्यात आलीय.जुन्या लोकसभेत जास्तीत जास्त 552 व्यक्ती बसू शकतात. नवीन लोकसभेच्या इमारतीची क्षमता 888 आसनांची आहे. जुन्या राज्यसभेच्या इमारतीत 250 सदस्यांची आसनक्षमता आहे, तर नवीन राज्यसभा सभागृहाची क्षमता 384 पर्यंत वाढवण्यात आली आहे.नवीन संसद भवनाच्या संयुक्त बैठकीदरम्यान 1272 सदस्य तिथे बसू शकणार आहे.

गणेशोत्सवाच्या काळात अधिवेशन का बोलवण्यात आले, अशी टीका विरोधकांना सुरू असताना अखेरीस केंद्र सरकारने अधिवेशनाबद्दल खुलासा केला आहे. गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर नव्या संसदेत प्रवेश केला जाणार आहे. त्यामुळे या अधिवेशनाच्या निमित्ताने नव्या संसद भवनाचे दार आता खुले होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Narendra Modi - New Parliament Building
Sonia Gandhi Letter To PM : सोनिया गांधींचे पंतप्रधानांना पत्र ; विशेष अधिवेशनाचा अजेंडा जाहीर करण्याची मागणी

काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना पत्र लिहून संसदेच्या विशेष अधिवेशनाचा अजेंडा जाहीर करण्याची मागणी केली आहे. कोणतीही चर्चा न करता विशेष अधिवेशन का जाहीर करण्यात आले, असा सवाल सोनिया गांधी यांनी केला आहे. मंगळवारी (५ सप्टेंबर) त्यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसची बैठक झाली.

त्यानंतर 'इंडिया' आघाडीच्या पक्षांच्या खासदारांसोबत बैठक झाली. अधिवेशनात विरोधक कोणते मुद्दे उपस्थित करणार आहेत, याबाबत बैठकीत चर्चा झाली. संसदेच्या विशेष अधिवेशनाचा अजेंडा जाहीर न होण्याची ही पहिलीच वेळ आहे, ही दुर्दैवी बाब आहे, असे सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी पत्रात म्हटले आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com