

PM Modi Convoy Cut : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतंच देशभरातील नागरिकांना सोनं खरेदी टाळण्यासह पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करण्याचं आवाहन केलं होतं. जागतिक तेल संकटाच्या पार्श्वभूमीवर मोदींनी हे आवाहन केलं होतं.
अशातच आता खुद्द पंतप्रधान मोदी यांनी आपल्या स्वतःच्या वाहनांच्या ताफ्याचा आकार कमी करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. हा निर्णय घेत पंतप्रधान मोदींनी सरकारी खर्चात मोठी कपात करण्यासाठी मोठं पाऊल उचललं आहे.
त्यांच्या या निर्णयामुळे इधन बचतीचा सरकारमधील मंत्र्यांसह इतर अधिकाऱ्यांमध्ये एक मोठा संदेश गेला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पंतप्रधानांनी आपल्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या 'विशेष सुरक्षा गटाला' (SPG) आपल्या ताफ्यातील वाहनांची संख्या ५० टक्क्यांपर्यंत कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश दिले आहेत.
यासह त्यांनी कोणत्याही नवीन वाहनांची खरेदी न करताच, इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. SPG ने या निर्देशांची अंमलबजावणी तात्काळ सुरू केली आहे. विशेष म्हणजे, 'ब्लू बुक'मध्ये नमूद केलेल्या कडक सुरक्षा नियमावलीबाबत कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नसल्याचीही माहिती सुत्रांनी दिली आहे.
दरम्यान, एका अधिकाऱ्याने सांगितलं की, सर्व विभाग इंधनाची बचत करण्यासाठीच्या पर्यायांचा शोध घेत आहेत. पंतप्रधानांचा संदेश सर्वांनाच लागू होतो. आम्ही 'कर्मचारी विभागा'कडून सविस्तर सूचनांची प्रतीक्षा करत आहे. शिवाय सोमवारी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या नेतृत्वाखालील मंत्र्यांच्या बैठकीत अनावश्यक प्रवासावर निर्बंध घालून इंधनाची बचत करण्यावरही चर्चा करण्यात आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.