PM Narendra Modi : सेंट्रल हॉलमध्ये येताच मोदींनी संविधानावर टेकवला माथा

NDA Parliamentary Board Meeting PM Narendra Modi : संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये एनडीएच्या संसदीय दलाची बैठक सुरू आहे. या बैठकीला एनडीएतील सर्व मित्रपक्षांचे नेते उपस्थित आहेत.
Pm Narendra Modi
Pm Narendra ModiSarkarnama

New Delhi : लोकसभा निवडणुकीत बहुमत मिळवल्यानंतर एनडीएच्या संसदीय दलाची पहिली बैठक शुक्रवारी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये सुरू आहे. या बैठकीला दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदींची आगमन झाले. हॉलमध्ये आल्यानंतर मोदींनी संविधानाला नमन करताना माथा टेकवला.

निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी एनडीएवर संविधानावरून जोरदार टीका केली होती. भाजपच्या 400 पारच्या घोषणेचा आधार त्यासाठी घेण्यात आला होता. भाजपच्या काही खासदारांनी संविधान बदलण्यासाठी 400 हून अधिक खासदार हवे आहेत, अशी विधाने केली होती. भाजप पुन्हा सत्तेत आल्यास संविधान बदलेल, असा प्रचार विरोधकांकडून करण्यात आला होता.  

संविधान बदलण्याच्या अपप्रचारामुळे मतदारांनी विरोधकांना मतदान केल्याचा दावाही अनेक नेत्यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी संसदेत पहिले पाऊल ठेवताच संविधानाला नमन केले. त्याआधी त्यांनी सेंट्रल हॉलमध्ये उपस्थित सर्व खासदार, नेत्यांना अभिवादन केले.

बैठकीला चंद्रबाबू नायडू, नितीश कुमार, एकनाथ शिंदे अजित पवार, चिराग पासवान, पवन कल्याण यांच्यासह सर्व मित्रपक्षांचे नेते, खासदार उपस्थित होते. दरम्यान, बैठकीत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी भाजपच्या संसदीय दलाचे नेते, लोकसभेतील नेते आणि एनडीएच्या संसदीय नेतेपदी पंतप्रधान मोदींच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. त्याला गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अनुमोदन दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com