Women Welfare Scheme : लाडक्या बहिणींना सुगीचे दिवस, रोजंदारीसह योजनेची लक्ष्मी प्रसन्न होणार

Ladkya Bahin Yojana benefits for women : महाराष्ट्रातील लाडक्या बहिण योजनेमुळे महिलांना मोठा दिलासा. रोजंदारीसह आर्थिक लाभ मिळणार, महिलांच्या सक्षमीकरणाला बळ.
ladki bahin yojana
ladki bahin yojanaSarkarnama
Published on
Updated on

कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक मतदानाला अवघे दोन दिवस शिल्लक असताना प्रचाराच्या संपूर्ण कालावधीत लाडक्या बहिणींना सुगीचे दिवस आले आहेत. दिवसागणिक रोजंदारी सह राज्य सरकारच्या लाडक्या बहिणी योजनेची लक्ष्मी दोन दिवसात पावणार असल्याने पाचवी हात तुपात जाणार आहेत. सध्या लाडक्या बहिणींना प्रचाराच्या निमित्ताने चांगले दिवस आले आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महिलांसाठीचे आरक्षण वाढल्याने निवडणुकीत

महिला उमेदवारांची संख्या वाढली आहे. केवळ उमेदवाराच नव्हे, तर आता प्रचारासाठीही महिला कार्यकर्त्यांना पसंती मिळत आहे. त्यातून महिलांना निवडणुकीच्या काळात नवा रोजगार मिळाला आहे. पत्रके वाटणे, जेवणावळींसाठी चपात्या लाटणे इथंपासून ते नागरिकांना मतदान कसे करायचे याचे प्रबोधनही महिला कार्यकर्त्या करत आहेत. सर्वसाधारणपणे एक महिला कार्यकर्ता दिवसाला ५०० ते ८०० रुपये मिळवत आहे.

ladki bahin yojana
Pankaja Munde : "ताई... ओ ताई...!" कार्यकर्त्याची एक हाक अन् पंकजा मुंडेंनी जे केलं, त्याने जिंकली लाखो मने! 'व्हिडिओ' होतोय तुफान व्हायरल!

दरम्यान, केवळ सभांना गर्दी करण्यापुरता महिलांचा सहभाग न घेता उमेदवारांनी यंदा त्यांच्यावर प्रचाराची मोठी धुरा सोपवली आहे. सध्या पेठापेठांमध्ये आणि उपनगरांमध्ये सकाळी नऊ वाजल्यापासूनच महिलांची पथके सक्रिय झालेली आहेत. उमेदवारांची माहिती असलेली पत्रके वाटणे, घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधणे आणि ईव्हीएम मशीनवर पसंतीचा उमेदवार कसा शोधायचा व मतदान कसे करायचे, याचे प्रात्यक्षिक दाखवणे अशी महत्त्वाची कामे या महिला कौशल्याने पार पाडत आहेत.

पुरुष कार्यकर्त्यांच्या तुलनेत महिलांचे बोलणे मतदार अधिक संयमाने ऐकून घेत असल्याने उमेदवारांनी महिलांच्या संवादावर अधिक भर दिला आहे. कोल्हापुरी पाहुणचारालाही ऊत आला आहे. प्रभागातील कार्यकर्त्यांसाठी होणाऱ्या जेवणावळी आणि मतदारांसाठीची मेजवानी यामुळे केटरिंग व्यवसायात मोठी तेजी आली आहे. यामध्ये प्रामुख्याने महिलांचा मोठा सहभाग दिसून येतो.

मोठ्या प्रमाणावर जेवण तयार करणे, विशेषतः कोल्हापुरी तांबडा-पांढरा रस्सा आणि हजारो चपात्या लाटण्याचे काम महिला वर्ग रात्रीचा दिवस करून पूर्ण करत आहेत. चपात्या लाटणे, वाढपी म्हणून काम करणे आणि जेवणानंतरची स्वच्छता व भांडी घासणे यांसारख्या कामांमधून कष्टकरी महिलांना उत्पन्नाची संधी मिळाली आहे.बचत गटांना कंत्राट अनेक ठिकाणी महिला बचत गटांना चपाती आणि भाजी पुरवण्याचे कंत्राट दिले आहे. यामुळे * समूहाने काम करणाऱ्या महिलांना एकत्र येऊन आर्थिक कमाई करता येत आहे. एरवी घरकाम किंवा शेतमजुरी करणाऱ्या महिलांना निवडणुकीच्या या पंधरा-वीस दिवसांच्या काळात मिळालेला हा रोजगार त्यांच्या कुटुंबासाठी मोठा आधार ठरत आहे.

ladki bahin yojana
Candidate Controversy : उमेदवारानेच हात पसरले; शिंदेंचा शिलेदार मतदारांकडे मागतोय पैसे; नेमकं प्रकरण काय? मतदारांना पैसेही मागतोय!

शेतमजुरीवर परिणाम एरव्ही केटरिंग व्यवसाय व शेतात शेतमजूर म्हणून मोठ्या संख्येने महिला कार्यरत असतात. सध्या निवडणुकीत प्रचारासाठी केवळ तीन चार तासांतच मजुरीपेक्षा जास्त रक्कम मिळत असल्याने केटरिंग व शेतमजूर म्हणून महिलांनी जाणे बंद केले आहे. यामुळे केटरिंग व शेतीतील कामांवर मात्र परिणाम झाला आहे. प्रचारातून 'दुहेरी' कमाई अनेक प्रभागात दुरंगी, तिरंगी व बहुरंगी लढती होत असून, उमेदवारांकडून प्रचारासाठी महिला कार्यकर्त्यांना मागणी आहे. यामुळेच महिला सकाळी एका पक्षाचा प्रचार, तर संध्याकाळी दुसऱ्या पक्षाचा प्रचार करत दुहेरी कमाई करत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com