Sanjana Jadhav News : रावसाहेब दानवेंची आमदार कन्या, कट्टर राजकीय विरोधकाच्या मुलीच्या प्रचाराला!

Raosaheb Danve daughter political campaign : रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव यांनी कट्टर राजकीय विरोधकाच्या मुलीच्या प्रचारात सहभाग घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा.
Sanjana Jadhav Danve
Sanjana Jadhav DanveSarkarnama
Published on
Updated on

Shivsena-BJP News : जालना जिल्ह्याच्या राजकारणातील दोन प्रमुख नेते पण एकमेकांचे कट्टर विरोधक असलेल्या रावसाहेब दानवे आणि आमदार अर्जुन खोतकर यांच्या पुढच्या पिढीत मात्र मैत्रीपूर्ण संबंध असल्याचे दिसून आले आहे. 2024 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत युती असताना अर्जून खोतकर यांनी भाजपचे रावसाहेब दानवे यांच्याविरोधात काम केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. याच कारणामुळे जालना महापालिकेत शिवसेना-भाजप युतीही होऊ शकली नाही. पण याच रावसाहेब दानवे यांची आमदार कन्या संजना जाधव यांनी मात्र पक्षाचा आदेश पाळत अर्जुन खोतकर यांच्या कन्येचा जोरदार प्रचार केला.

एकीकडे भाजप आणि रावसाहेब दानवे हे महापालिकेत पहिला महापौर बसवण्यासाठी अर्जुन खोतकर यांच्यावर तुटून पडले आहेत. तर दुसरीकडे काल कन्नडच्या शिवसेना आमदार संजना जाधव यांनी खोतकर यांच्या कन्या दर्शना हिच्या प्रचारासाठी जालन्यात येऊन मतदारांना आवाहन केले. 'मी आमदार नसलो म्हणून काय झालं? मी दोन आमदारांचा बाप आहे' हे रावसाहेब दानवे यांचे विधान सध्या चांगलेच चर्चेत आहे. तर या दोन आमदारांपैकी संजना जाधव यांना विधानसभा निवडणुकीत कन्नड मतदारसंघातून रावसाहेब दानवे यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून उमेदवारी मिळवून दिली होती.

Sanjana Jadhav Danve
Candidate Controversy : उमेदवारानेच हात पसरले; शिंदेंचा शिलेदार मतदारांकडे मागतोय पैसे; नेमकं प्रकरण काय? मतदारांना पैसेही मागतोय!

संजना जाधव या निवडून आल्यामुळे वडील, भाऊ भाजपात आणि त्या शिवसेनेत असे चित्र आहे. राजकीय अपरिहार्यता म्हणा किंवा मग पक्षाचा आदेश संजना यांना आपल्याच वडीलांच्या कट्टर राजकीय विरोधकांच्या मुलीसाठी मतं मागण्याची वेळ आली आहे. अर्जुन खोतकर यांचे कौतुक करताना संजना जाधव यांनी जालना शहराच्या विकास आणि त्यासाठी कोट्यावधींचा निधी आणल्याचे श्रेय त्यांना दिले.

खोतकर हे शिवसेनेत असले तरी त्यांचे सगळ्याच राजकीय पक्षांशी चांगले संबंध असल्याचे सांगत जालन्याच्या विकासासाठी त्यांच्यावर डोळे झाकून विश्वास टाका, असे आवाहन केले. संजना जाधव यांच्या या भाषणाची सोशल मिडियावर चर्चा होत असतानाच राजकारणात कोणी कोणाचा कायम मित्र किंवा शत्रू नसतो हे पटल्याशिवाय राहत नाही. नगरपालिकेचे रुपांतर महापालिकेत झाल्यानंतर सत्तेसाठी महायुतीतील शिवसेना-भाजप या दोन पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे.

Sanjana Jadhav Danve
Women Welfare Scheme : लाडक्या बहिणींना सुगीचे दिवस, रोजंदारीसह योजनेची लक्ष्मी प्रसन्न होणार

रावसाहेब दानवे, अर्जुन खोतकर, कैलास गोरंट्याल, काँग्रेसचे खासदार कल्याण काळे या नेत्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. युती न झाल्यामुळे शिवसेना-भाजप हे दोन्ही पक्ष स्वबळावर लढत आहेत. दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप आणि एकमेकांची उणीदुणी काढली जात आहेत. असे असताना रावसाहेब दानवे यांची कन्याच अर्जुन खोतकर यांच्यासाठी प्रचार करत असल्याने याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com