
New Delhi : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवीन वर्षाची सुरूवात आनंददायी झाली आहे. त्यांनी पहिल्याच दिवशी केलेल्या गडचिरोली दौऱ्याची दखल थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली आहे. या दौऱ्यात फडणवीसांनी विविध विकासकामांचे लोकार्पण केले होते. तसेच 11 नक्षलवाद्यांनीही आत्मसमर्पण केले होते.
पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियातून महाराष्ट्र सरकारच्या कामाचे कौतुक केले आहे. दुर्गम आणि माओवादग्रस्त भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी महाराष्ट्र सरकार करत असलेल्या प्रयत्नांचे मी कौतुक करतो, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. या कामामुळे जीवन सुलभतेला निश्चितच चालना मिळेल आणि आणखी प्रगती साधण्याचा मार्ग प्रशस्त होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
गडचिरोली आणि त्याच्या आजूबाजूच्या प्रदेशातील नागरिकांचेही पंतप्रधान मोदींनी विशेष अभिनंदन केले आहे. नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच पंतप्रधानांनी सरकारचे म्हणजे अर्थात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीवर एकप्रकारे कौतुकाची थाप दिली आहे.
गडचिरोली जिल्ह्यात आगमन झाल्यानंतर बुधवारी मुख्यमंत्री फडणवीस हे थेट ताडगुडा ब्रीज येथे गेले होते. गट्टा-गर्देवाडा-वांगेतुरी मार्ग तसेच ताडगुडा पुलाचे त्यांनी लोकार्पण त्यांच्या हस्ते झाले. हा परिसर अतिदुर्गम व नक्षलप्रभावीत मानला जातो. या भागात जाणारे ते पहिलेच मुख्यमंत्री आहेत.
• ताराक्कासह 11 जहाल नक्षलवादी शरण
• स्वातंत्र्याच्या 77 वर्षात प्रथमच अहेरी-गर्देवाडा बससेवा सुरु
• लॉईड्सच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ, 6 हजार 200 कोटींची गुंतवणूक, 9 हजार रोजगार
• कामगार आणि पूर्वाश्रमीच्या नक्षलवाद्यांना कंपनीचे 1000 कोटींचे समभाग प्रदान
• गडचिरोलीपासून 200 कि.मी. दूर पेनगुंडा येथे जवान, ग्रामस्थांशी संवाद
• सी- 60 जवानांचाही सत्कार
• पोलीस दलाला 5 बस, 14 चारचाकी, 30 मोटारसायकलीचे लोकार्पण
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.