Konkan News : कोकणातील ठाकरे गट सोमय्यांच्या विरोधात आक्रमक;प्रतिमेला काळे फासले, भाजपतून हकालपट्टीची मागणी

मुंबईपासून कोकणापर्यंत, तसेच विधीमंडळापासून मराठवाड्यापर्यंत सोमय्या यांच्याविरोधात शिवसेनेने आंदोलन करून रान पेटविले आहे.
Konkan News
Konkan NewsSarkarnama
Published on
Updated on

Ratnagiri News : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हारयल झाल्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रचंड आक्रमक झाली आहे. मुंबईपासून कोकणापर्यंत, तसेच विधीमंडळापासून मराठवाड्यापर्यंत सोमय्या यांच्याविरोधात शिवसेनेने आंदोलन करून रान पेटविले आहे. मालवणमध्ये सोमय्या यांच्या प्रतिमेस काळे फासण्यात आले, तर रत्नागिरी शिवसेनेने सोमय्या यांची भाजपने पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी केली आहे. (Expel Kirit Somaiya from BJP: Thackeray faction demands)

किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचे आक्षेपार्ह आणि संतापजनक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. त्यावरून विधान परिषदेपासून राज्यभरात अनेक गावांत निषेध करण्यात येत आहे. रत्नागिरी जिल्हा संपर्क कार्यालयसमोर ठाकरेंच्या गटाकडून निदर्शने करण्यात आली त्यांचा प्रतिकात्मक पुतळा दहन करण्यात आला.

Konkan News
Solapur Politic's : राष्ट्रवादीचे नेते उत्तम जानकरांची मोठी घोषणा; 'यापुढे कोणतीही निवडणूक लढवणार नाही'

शिवसेना (Shivsena) पदाधिकारी, मराठी माणसांवर खोटेनोट आरोप करणाऱ्या सोमय्याचे अनेक अश्लिल व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. मराठी माणूस आणि विरोधी पक्षनेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करून त्यांना बदनाम करणाऱ्या सोमय्याचे खरे रूप आता जनतेपुढे आले आहे. त्यांच्यावर कडक कारवाई करून त्यांची भाजपमधून हकालपट्टी करावी, अशी मागणी ठाकरे शिवसेनेचे रत्नागिरी जिल्हाप्रमुख विलास चाळके यांनी केली.

Konkan News
Kirit Somaiya viral video : सोमय्या यांच्या अडचणीत वाढ; दानवेंचा पेन ड्राईव्ह आणि फडणवीसांची घोषणा...

बेटी बचाओचा नारा देणाऱ्या भारतीय जनता पक्षापासून आता बेटीला वाचवायला पाहिजे, अशी म्हणण्याची वेळ आली आहे. शिवसेना, विरोधी पक्षनेते आणि मराठी माणसांवर त्यांनी अनेक खोटे आरोप केले आहेत. खोट्या केसेसमध्ये त्यांना फसवलं आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेकडे शिवसेनेचे लक्ष असणार आहे, असेही विलास चाळके यांनी स्पष्ट केले.

Konkan News
Indapur politic's : राज्यात एकत्र आलेल्या भाजप-राष्ट्रवादीमध्ये इंदापुरात श्रेयवादाची लढाई

सोमय्या याने मातोश्रीवर अनेक आरोप केले होते. कालाये तस्मै नम: या उक्तीप्रमाणे आता त्यांची वेळ आली आहे. त्यांच्या पापाचा घडा भरलेला आहे. त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी आमची मागणी आहे, असे ठाकरे सेनेच्या महिला पदाधिकारी संध्या कोसुंबकर यांनी सांगितले.

मालवणमध्ये प्रतिमेला जोडे मारले

दरम्यान, मालवण शहरात किरीट सोमय्या यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. सोमय्या यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत त्यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले. किरीट सोमय्या हा महाराष्ट्राला लागलेला कलंक असून त्यांची कृती महिलांचा अपमान करणारी आहे. भाजपा आताही त्याला पाठीशी घालणार काय? असा प्रश्न तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी यावेळी उपस्थित केला. या आंदोलनात महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com