PM Modi Italy Visit : मोदींची तिसरी टर्म, पहिलाच परदेश दौरा; तोही जॉर्जिया मेलोनींच्या इटलीचा! 'हे' आहे कारण

PM Modi and Giorgia Meloni : इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी 'या'साठी पंतप्रधान मोदींना निमंत्रित केले होते.
PM Modi and  Giorgia Meloni
PM Modi and Giorgia MeloniSarkarnama

PM Modi and Italy G7 Meeting: मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळाला सुरुवात झाली आहे. याशिवाय मोदींच्या मंत्रिमंडळातील खातेवाटपही जाहीर झालं आहे आणि मंत्र्यांनी पदभार घेतले आहेत. याचबरोबर आता पंतप्रधान मोदींचा पहिला परदेश दौराही निश्चित झाला आहे.

मोदी आपल्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिल्याच परदेश दौऱ्यावर इटलीला जाणार आहेत. काही दिवसांपूर्वीच मोदींना इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी पंतप्रधान मोदींना यावर्षी होणाऱ्या G7 परिषदेत सहभागी होण्यासाठी निमंत्रित केले होते.

मोदींच्या(PM Modi) या इटली दौऱ्याचे वेळापत्रक समोर आले आहे. प्राप्त माहितीनुसार मोदी 13 जून रोजी इटलीसाठी रवाना होणार आहेत. ते 'G7' मध्ये विशेष निमंत्रित सदस्य देश म्हणून सामील होणार आहेत. तर ही परिषद संपल्यानंतर पंतप्रधान मोदी 15 जूनला भारतात परतणार आहेत.

याशिवाय मोदींच्या या दौऱ्यात त्यांची इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी(Giorgia Meloni) यांच्यासोबतही बैठक होणार आहे. तसेच युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमिर झेलेन्स्की हेही इटलीला बैठकीसाठी उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.

PM Modi and  Giorgia Meloni
NDA Cabinet : मोदींच्या कॅबिनेटमध्ये मुलगा, सून, जावई..! मंत्रिमंडळ नव्हे ‘परिवार मंडळ’…

यंदाची G7 देशांची बैठक इटलीत आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन(Joe Biden), कॅनडाचे जस्टिन ट्रुंडो, जपानचे पंतप्रधान फुमीओ किशिदा, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन आदी महत्त्वाचे नेते उपस्थित असणार आहेत. या बैठकीत रशिया-युक्रेन युद्धावर चर्चा होणार असल्याचीही माहिती समोर आली आहे.

G7 हा जगातील 7 विकसित देशांचा समूह आहे ज्यामध्ये अमेरिका, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान आणि ब्रिटन यांचा समावेश आहे. त्याला ग्रुप आणि 7 असेही म्हणतात.

PM Modi and  Giorgia Meloni
Mallikarjun Kharge Vs Narendra Modi 'दुसऱ्यांच्या घरातून खुर्च्या उधार घेवून..' ; मल्लिकार्जुन खर्गेंचा पंतप्रधान मोदींवर निशाणा!

या आधी हा ग्रुप G8 असा होता. मात्र 2014मध्ये रशियाने क्रिमियावर हल्ला केल्यानंतर या देशाचं सदस्यत्व रद्द केलं गेलं. त्यामुळे या ग्रुपमध्ये आता अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, ब्रिटन, इटली, जपान आणि कॅनडा यांचा समावेश आहे.

G7 शिखर परिषदेत जागतिक आर्थिक संकट, स्वातंत्र्य आणि मानवाधिकार, लोकशाही, शाश्वत विकास, कायद्याचे राज्य इत्यादी मुद्द्यांवर चर्चा केली जाते. दरवर्षी गटाचा वेगळा सदस्य देश या बैठकीचे अध्यक्षस्थान करतो. राष्ट्रपती दुसऱ्या देशाला विशेष अतिथी म्हणून निमंत्रित करतात.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com