Mallikarjun Kharge Vs Narendra Modi 'दुसऱ्यांच्या घरातून खुर्च्या उधार घेवून..' ; मल्लिकार्जुन खर्गेंचा पंतप्रधान मोदींवर निशाणा!

Mallikarjun Kharge on 'Modi ki Guarantee' : जाणून घ्या, खर्गेंनी 'मोदी की गॅरंटी'वरून नेमका काय टोला लगावला आहे.
Mallikarjun Kharge Vs Narendra Modi
Mallikarjun Kharge Vs Narendra ModiSarkarnama

Mallikarjun Kharge and Modi 3.0 News : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. त्यांनी म्हटले की, पंतप्रधान मोदींनी मागील गॅरंटी तर पूर्ण केली नाही, परंतु आता ढोल बडवत आहेत.

खर्गे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर लिहिले की, लोकसभा निवडणुकीत देशाने असं उत्तर दिलं की, मोदींना दुसऱ्यांच्या घरातील खुर्च्या उधार घेवून, आपले सत्तेचे घर सांभाळावे लागत आहे.

त्यांनी पुढे म्हटले की, 17 जुलै 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला मोदींची गॅरंटी दिली होती, 2022 पर्यंत प्रत्येक भारतीयाच्या घरावर छत असेल. मात्र ही गॅरंटी पोकळ ठरली. याशिवाय खर्गे(Mallikarjun Kharge) यांनी म्हटले की आता, 3 कोटी घरं देण्याबाबत अशा बढाया मारत आहेत, की जसं काही मागील गॅरंटी पूर्ण केली आहे. देशाला सत्य माहीत आहे.

खर्गेंनी म्हटले की, यंदा तीनकोटी घरांसाठी कोणतीही कालमर्यादा निश्चित केलेली नाही. असं यासाठी कारण भाजपने मागील दहा वर्षांमध्ये काँग्रेस-यूपीएच्या तुलनेत पूर्ण 1.2 कोटी घरं कमी बनवली. काँग्रेसने 4.5 कोटी घरांची निर्मिती केली. तेच भाजप (2014-24) 3.3 कोटी घरं बनवू शकली.

Mallikarjun Kharge Vs Narendra Modi
Congress News : इंडिया आघाडीचा सस्पेन्स कायम; सत्ता स्थापन करणार की विरोधात बसणार ? खर्गे म्हणाले ...

खर्गेंनी दावा केला की, मोदींच्या घरकुल योजनांमध्ये 49 लाख शहरी घरकुल म्हणजेच 60 टक्के घरांचा बहुतांश पैसा जनतेने आपल्या खिशातून भरला. त्यांनी म्हटले की, एक सरकारी बेसीक शहरी घर सरासरी 6.5 लाखांचे बनते.

यामध्ये केंद्र सरकार केवळ 1.5 लाख देतात. यामध्ये 40 टक्के योगदान राज्य आणि नगरपालिकेचेही असते. उर्वरित ओझं जनतेच्या माथी येतं, असं संसदीय कमिटीने म्हटले आहे.

Mallikarjun Kharge Vs Narendra Modi
Rahul Gandhi : राहुल गांधी 'वायनाड' सोडून पारंपारिक 'रायबरेली'लाच देणार पसंती?

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या(PM Modi) अध्यक्षतेखाली सोमवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत पंतप्रधान आवास योजना अंतर्गत तीन कोटी घरांच्या निर्मितीसाठी सरकारी मदतीस मंजूरी दिली गेली.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com