Narendra Modi News : निवडणुकांपूर्वी पंतप्रधान मोदींची मध्य प्रदेश अन् छत्तीसगडला मोठी भेट; एक लाख रोजगार...

Narendra Modi On Madhya Pradesh Election : "पंतप्रधान मोदी बीनामध्ये सुमारे 2 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची भेट देत आहेत.."
Narendra Modi
Narendra Modi Sarkarnama

Madhya Pradesh News : मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुकांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी मध्य प्रदेशला मोठी भेट देणार आहेत. मोदी मध्य प्रदेशातील बीना येथे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) रिफायनरीची पायाभरणी करणार आहेत. या प्रकल्पामध्ये राज्यभरातील 10 नवीन औद्योगिक प्रकल्पांचा समावेश आहे. 49 हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून उभारण्यात येणाऱ्या पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्समध्ये एक लाखाहून अधिक लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. (Latest Marathi News)

Narendra Modi
Parliament Special Session: मोदी सरकारने का बोलावले विशेष अधिवेशन ? अधिवेशनाचा अजेंडा आला समोर

या प्रकल्पामुळे परिसरातील कुशल तरुणांच्या विकासाला चालना मिळेल, असे बीपीसीएलने म्हटले आहे. या प्रकल्पाच्या उभारणीच्या सुरुवातीच्या टप्प्यातच जवळपास 15 हजार लोकांना रोजगार मिळणार आहे. प्रकल्प पूर्णपणे तयार झाल्यानंतर एक लाखांपेक्षा अधिक प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होतील.

पंतप्रधान नर्मदापुरम जिल्ह्यातील 10 इतर प्रकल्प, इंदूर जिल्ह्यातील दोन आयटी पार्क, रतलाम जिल्ह्यातील एक औद्योगिक पार्क आणि राज्यभरातील सहा नवीन औद्योगिक क्षेत्रांची पायाभरणी करतील. शाजापूर, गुना, मौगंज, अगरमालवा, नर्मदापुरम आणि माकसी येथे हे नवीन औद्योगिक क्षेत्र स्थापित केले जाणार आहे.

राज्याचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान म्हणाले , "पंतप्रधान मोदी बीनामध्ये सुमारे 2 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची भेट देत आहेत. ही विकासाची दृष्टी आहे. यामुळे परिसराचा विकास वाढेल आणि लाखो लोकांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होतील."

Narendra Modi
Bhandara BJP News : भाजपच्या निष्ठावंतांना नकोय बाहेरचा माणूस; 'प्रकाश’पर्वात झाला अंधार !

मध्य प्रदेशानंतर पंतप्रधान मोदी छत्तीसगडमध्ये जाणार आहेत. तेथे ते 6,350 कोटी रुपयांचे रेल्वे प्रकल्पांचे लोकार्पण करतील. 9 जिल्ह्यांमधील आरोग्य केंद्रांची पायाभरणी मोदींच्या हस्ते होणार आहे. याशिवाय एक लाख 'सिकल सेल समुपदेशन कार्ड'ही वितरित करण्यात येणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवर माहिती दिली आहे की, "मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील माझ्या देशवासीयांसाठी उद्याचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. दोन्ही राज्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकार सातत्याने कटिबद्धतेने काम करत आहेत. यासंदर्भात उद्या अनेक मोठ्या प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करण्याचे सौभाग्य मिळत आहे."

(Edited By - Chetan Zadpe)

Narendra Modi
Maharashtra politics : 'भाऊंनी' घातली 'दाजीं' ना भगवी टोपी ! भाजप-राष्ट्रवादीची मैत्री पक्की

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com