Gandhi vs Savarkar Politics : सावरकरांनी माफी मागितल्याचे पुरावे द्या; रणजित सावरकरांचे राहुल गांधींना खुले आव्हान

Gandhi vs Savarkar Politics | काँग्रेस नेते राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन सध्या राजकारण तापलं आहे.
Gandhi vs Savarkar Politics
Gandhi vs Savarkar PoliticsSarkarnama
Published on
Updated on

Rahul Gandhi news : काँग्रेस नेते राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन सध्या राजकारण तापलं आहे. भाजप नेते राहुल गांधींविरोधात आक्रमक झाले आहेत. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनीही राहुल गांधींना सावरकरांविरोधात अशी वक्तव्ये न करण्याचा सल्ला दिला आहे. यानंतर आता या वादात सावरकरांचे नातू रणजित सावरकर यांनीही उडी घेतली असून सावरकरांनी माफी मागितल्याचे पुरावे दाखवण्याचे आव्हान राहुल गांधींना दिले आहे. (Provide evidence that Savarkar apologized; Ranjit Savarkar's open challenge to Rahul Gandhi)

राहुल गांधी म्हणतात की, ते सावरकर नाहीत म्हणून माफी मागणार नाही. पण त्यांनी सावरकरांनी माफी मागितल्याची कागदपत्रे दाखवावीत, असे मी त्यांना आव्हान देतो. या उलट राहुल गांधींनीच सर्वोच्च न्यायालयात दोनदा माफी मागितली आहे. त्यामुळे ते जे काही बोलत आहेत तो बालिशपणा आहे.देशभक्तांच्या नावाचा वापर करून राजकारण वाढवणे निषेधार्ह. अशी टिकाही रणजित सावरकर यांनी केली आहे.

Gandhi vs Savarkar Politics
Rahul Gandhi Controversial Speech : माफी मागायला मी सावरकर आहे का? राहुल गांधींनी पुन्हा भाजपला डिवचलं

दरम्यान, खासदारकी रद्द झाल्यानंतर दोन दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली होती.यावेळी त्यांना तुम्ही माफी मागणार का सवाल विचारला असता उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले होते की, मी माफी मागणार नाही, मी सावरकर नाही.पण त्यांच्या या उत्तरानंतर भाजप प्रचंड आक्रमक झाली आहे. राहुल गांधींच्या या वक्तव्याविरोधात भाजप पुन्हा आक्रमक झाली.तर उद्धव ठाकरेंनी त्यांना खेडच्या सभेत सावरकरांविषयी वक्तव्ये न करण्याबाबत ठणकावल होतं. तर राज्यसभा खासदार संजय राऊत यांनीही राहुल गांधींना असे बोलणे टाळण्याचा सल्ला दिला आहे.

'स्वातंत्र्यवीर सावरकर हे आमचं दैवत आहे. त्यामुळे त्यांचा अपमान कधीही सहन करणार नाही. आपण एकत्र आलो आहोत. ते देशातील लोकशाही वाचवण्यासाठी. पण स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान कदापि सहन करणार नाही'', असा इशाराही त्यांनी दिला.'स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 14 वर्ष छळ सोसला. सावरकरांनी 14 वर्ष मरण यातना सोसल्या. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी जे केलं ते कुणाचेही काम नाही. त्यामुळे आपण लोकशाही टिकविण्यासाठी एकत्र आलो आहोत, लोकशाही टिकविण्यासाठी आपण लढत आहोत, त्याला फाटे फोडू नका'', असा सल्लाही राहुल गांधींना उद्धव ठाकरे यांनी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com