Anna Sebastian Perayil : पुण्यातील महिला कर्मचाऱ्याच्या मृत्यूची मोदी सरकारकडून चौकशी सुरू; कामाच्या ताणामुळे गमावला जीव

Modi Government EY Company Work Stress : अ‍ॅना सेबेस्टियन पेरायिल या तरुणीचा कामाच्या ताणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
Anna Sebastian Perayil
Anna Sebastian Perayil Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुण्यातील ई. वाय. इंडिया कंपनीतील एका महिला कर्मचाऱ्याचा कामाच्या ताणामुळे मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या तरुणीच्या आईचे कंपनीच्या अध्यक्षांना लिहिलेले पत्र सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर देशभरात त्याचे पडसाद उमटले आहे. मोदी सरकारकडूनही त्याची दखल घेत या घटनेची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

अ‍ॅना सेबेस्टियन पेरायिल असे या तरुणीचे नाव आहे. ती पुण्यातील ई. वाय. इंडिया कंपनीत मार्च 2024 पासून काम करत होती. जुलै महिन्यात तिचा मृत्यू झाला. ती केवळ 26 वर्षांची होती. मुलीच्या मृत्यूच्या धक्क्यातून सावरल्यानंतर आईने कंपनीचे अध्यक्ष राजीव मेमानी यांनी एक पत्र लिहिले होते. कामाचे ओझे, नवीन वातावरण आणि कामाचे अधिक तास यामुळे अ‍ॅना शरीराने आणि मनानेही थकली होती, असे पत्रात लिहिले होते. हे पत्र व्हायरल झाल्यानंतर ही घटना समोर आली.

Anna Sebastian Perayil
Ladki Bahin Yojana : भाजपसाठी हरियाणातील बहिणी महाराष्ट्रापेक्षा लाडक्या; निवडणुकीआधी 20 मोठ्या घोषणा...

कंपनीची चौकशी सुरू

केंद्रीय कामगार राज्यमंत्री शोभा करंजलाजे यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याची माहिती दिली आहे. ‘असुरक्षित आणि कामाच्या अतिरिक्त ताणाच्या आरोपांची सखोल चौकशी सुरू आहे. अ‍ॅना सेबेस्टियन पेरायिल यांच्या निधनामुळे खूप दुःख झाले. आम्ही न्याय मिळवून देण्यासाठी वचनबद्ध आहोत आणि कामगार मंत्रालयाने अधिकृतपणे तक्रार दाखल करून घेतली आहे’, असे करंदलाजे यांनी ‘एक्स’वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

काय म्हटलं होतं पत्रात?

तिला शारिरीक, भावनिक व मानसिक त्रास झाला. चिंता, निद्रानाश आणि तणावामुळे अ‍ॅना खचून गेली होती. तिच्यावर कामाचा खूप ताण होता. तिला थोडीही विश्रांती मिळत नव्हती. रात्री उशिरापर्यंत ती काम करायची. सुट्टीच्या दिवशीही तिला काम सांगितले जायचे. ज्या टीम लीडर व व्यवस्थापकाने माझ्या मुलीवर कामाचे ओझे टाकले, ज्यांच्यामुळे तिचा जीवा गेला, ते अंत्यविधीलाही आले नाही. तिच्यासाठी कुणीही एक मिनिटही वेळ काढला नाही, अशा भावना अनीता यांनी पत्रात व्यक्त केल्या होत्या.

Anna Sebastian Perayil
Atishi Oath Ceremony : त्या जिंकल्या...आता इतिहास घडवणार! सिसोदियांचे ते शब्द 21 तारखेला खरे ठरणार

अ‍ॅनाला जुलै महिन्याच्या सुरूवातीला त्रास सुरु झाला होती. ६ जुलैला तिच्या छातीत दुखू लागल्याने एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले होते. तज्ज्ञ डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर औषधे देऊन घरी पाठवण्यात आले होते. डॉक्टरांनी तिची झोप पूर्ण होत नसल्याची सांगत आराम करण्याचा सल्ला दिला होता. पण त्यानंतरही ती रुग्णालयातून थेट कंपनीत गेली. दोन आठवडे ती अशीच काम करत राहिली आणि २० जुलैला हृदयविकाराच्या झटक्याने तिचा मृत्यू झाला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com