अमृतसर : पंजाबमध्ये मुख्यमंत्री भगवंत मान (Bhawant Mann) यांच्या कॅबिनेटचा पहिला विस्तार आज पार पडला. मान यांच्या या कॅबिनेटमध्ये १० मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. यात ९ पुरुष आणि १ महिला मंत्र्यांचा समावेश आहे. यानंतर मान यांच्या नेतृत्वात पार पडलेल्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत पुढील एका महिन्यात २५ हजार नोकऱ्या देण्याचा निर्णयास मान्यता देण्यात आली आहे. याबाबत ट्विटरवरुन माहिती देण्यात आली आहे.
याबाबत बोलताना मान म्हणाले, निवडणुकीपूर्वी आम्ही दिलेल्या आश्वासनाप्रमाणे पंजाबमधील तरुणांना नोकऱ्यांची संधी उपलब्ध करुन देणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे. त्याप्रमाणे आज कॅबिनेटने मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत पुढील एका महिन्यात २५ हजार नोकऱ्या देण्याचा निर्णयास मान्यता देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री मान यांनी दोन दिवसांपूर्वी भ्रष्टाचार रोखण्यासाठीही निर्णय जाहीर केला आहे. २३ मार्च रोजी भगतसिंग यांच्या शहिद दिनी पंजाब सरकारकडून भ्रष्टाचार विरोधी हेल्पलाईन नंबर जारी केला जाणार आहे. तो माझा स्वतःचा वैयक्तित व्हॉट्सअॅप नंबर असणार आहे. जर कोणी लाच मागितल्यास त्यांचे व्हिडिओ किंवा ऑडिओ रेकॉर्डिंग या नंबरवर पाठवावे, भष्टाचाराच्या विरोधात कडक कारवाई केली जाणार आहे. पंजाबमध्ये आता भ्रष्टाचार चालणार नाही, असे निर्णय जाहीर करताना मान म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.