चंद्रकांतदादांनी मला ऑफर दिली पण..; उत्तरसभेत वसंत मोरेंचा गौप्यस्फोट

राज ठाकरेंच्या ठाण्यातील उत्तरसभेत सर्वांत आधी बोलण्याचा मान वसंत मोरेंना मिळाला.
Raj Thackeray and Vasant More
Raj Thackeray and Vasant More Sarkarnama
Published on
Updated on

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची ठाण्यात उत्तरसभा सुरू आहे. या सभेत माजी नगरसेवक वसंत मोरे (Vasant More) यांना सर्वांत आधी बोलण्याची संधी मिळाली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मला भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली होती, असा गौप्यस्फोट मोरेंनी या सभेत केला. (Vasant More News updates)

राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याबाबत घेतलेल्या भूमिकेवरुन मोरेंनी नाराजी व्यक्त केली होती. याची दखल घेऊन राज ठाकरेेंनी काल मोरेंची भेट घेतली होती. त्यांनीच मोरेंना आजच्या उत्तरसभेचे निमंत्रण दिलं होतं. उत्तरसभेत बोलताना मोरे म्हणाले की, मी आणि साईनाथ बाबर असे दोनच नगरसेवक पुण्यात आहोत. राज ठाकरेंच्या ब्लू प्रिंटनुसार आम्ही करतोय. आमचं काम बघायला तुम्ही पुण्यात या. पुण्यात भाजपचे 100, राष्ट्रवादी काँग्रेसचे 46, शिवसेनेचे 10 तर काँग्रेस 10 नगरसेवक आहेत. तरीही चर्चेतील चेहरा हा पुरस्कार मनसेच्या नगरसेवकाला मिळाला. आपण आपलं काम सामान्य जनतेपर्यंत पोचवायला हवं. महापालिकेत आम्ही काम केलंय. पुण्यात 16 वर्षांत 16 गार्डन करणारा मी एकमेव नगरसेवक आहे.

Raj Thackeray and Vasant More
सदावर्तेंच्या तोंडाला काळं फासणाऱ्यास 50 हजारांचं बक्षीस! भाजप नेत्याची वादग्रस्त घोषणा

ज्यावेळी मला पुरस्कार देण्यात आला, त्यावेळी आमदार चंद्रकांत पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. चंद्रकांतदादांनी मला पाहिलं. त्यावेळी ते मला म्हणाले की, तुम्ही भाजपमध्ये या तुम्ही नगरसेवक व्हाल. मी त्यांना सांगितलं की, 15 वर्षे भाजपच्या नगरसेवकांनाच पाडून मी नगरसेवक होतोय. मागच्या काही दिवसांत महाराष्ट्रातील एकही पक्ष असा राहिला की नाही ज्याने मला ऑफर दिली नाही. मनसेच्या एका नगरसेवकाला एवढी किंमत आहे. राज ठाकरेंकडे आपण राज्याची सत्ता दिली तर अमेरिकेतून आपल्या नगरसेवकांना फोन येतील. ते आपले काम पाहतील.

Raj Thackeray and Vasant More
केजरीवालांचा दे धक्का! मुख्यमंत्री मान यांना डावलून थेट हाती घेतली सूत्रे

वसंत मोरेंनी काल राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेतली. सुमारे दीड तास ही भेट चालली होती. या भेटीनंतर मोरेंनी माध्यमांशी संवाद साधून आपण 100 टक्के समाधानी असल्याचे जाहीर केले होते. राज ठाकरेंनी उद्याच्या ठाण्यातील सभेचे आमंत्रण दिल्याचेही त्यांनी सांगितले होते. आज ठाण्यात सभा होणार असल्याने सगळ्यांचे लक्ष तिकडे लागले होते. या सभेत वसंत मोरेंनाही भाषण करण्याची संधी मिळाली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com