केजरीवालांनी आपल्याच मुख्यमंत्र्यांना आणलं अडचणीत!

पंजाबमध्ये ऐतिहासिक विजय मिळवत आम आदमी पक्षाने सत्ता मिळवली आहे.
Bhagwant Mann News, Arvind Kejriwal News
Bhagwant Mann News, Arvind Kejriwal NewsSarkarnama

चंडीगड : पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने (AAP) सत्ता मिळली असून, मुख्यमंत्री म्हणून भगवंत मान (Bhagwant Mann) यांनी धूमधडाक्यात काम सुरू केले आहे. असे असले तरी आता ते अडचणीत आले आहेत. याला कारण आहेत आपचे संयोजक व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal). कारण केजरीवालांनी थेट पंजाबमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक मान यांच्या अनुपस्थितीत घेतल्याने गदारोळ उडाला आहे. यावरून विरोधकांनी मान यांची कोंडी केली आहे. (Arvind Kejriwal News)

केजरीवाल यांनी राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांच्या अनुपस्थितीत घेणे घटनाबाह्य असल्याचा मुद्दा विरोधकांनी उचलून धरला आहे. यामुळे मुख्यमंत्री मान अडचणीत आले आहेत. पंजाबमध्ये रिमोट कंट्रोल सरकार असल्याची ओरड विरोधकांनी सुरू केली आहे. सरकारचा रिमोट कंट्रोल दिल्लीत असल्याची टीका विरोधक करीत आहेत. आम आदमी पक्षाने पंजाबमधील जनतेचा विश्वासघात केला आहे, असा दावाही विरोधकांनी केला आहे.

Bhagwant Mann News, Arvind Kejriwal News
चंद्रकांतदादांनी मला ऑफर दिली पण..; उत्तरसभेत वसंत मोरेंचा गौप्यस्फोट

याबाबत बोलताना काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते प्रतापसिंग बाजवा म्हणाले की, पंजाबचे मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांना डावलून अशा प्रकारे केजरीवालांनी बैठक घेणं हे घटनाबाह्य आणि अस्वीकारार्ह आहे. दिल्लीतील रिमोट कंट्रोलवर चालणाऱ्या सरकारसाठी राज्यातील जनतेनं मतदान केलेलं नाही. केजरीवाल सर्व मंत्र्यांच्या अनुपस्थितीत बैठक घेणार आहेत, हे पंजाबचे मुख्यमंत्री मान यांनी आधी राज्यातील जनतेला कळवायला हवं होतं. राज्यातील जनतेच्या हक्कांचा हा भंग आहे.

Bhagwant Mann News, Arvind Kejriwal News
सदावर्तेंच्या तोंडाला काळं फासणाऱ्यास 50 हजारांचं बक्षीस! भाजप नेत्याची वादग्रस्त घोषणा

पंजाबमध्ये (Punjab) ऐतिहासिक विजय मिळवत आपने सत्ता मिळवली आहे. मुख्यमंत्री मान यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर कामांचा धडाका सुरू केला आहे. केजरीवाल यांनी मंत्र्यांनाही कामांसाठीचे उद्दिष्ट्य निश्चित करून दिले आहे. केजरीवाल यांच्याच आदेशानुसार हे करण्यात आले होते. आता केजरीवाल यांनी मुख्यमंत्र्यांना बाजूला करून स्वत:च सूत्रे हाती घेतली आहेत. केजरीवालांनी पंजाब वीज महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीला राज्याचे मुख्य सचिव आणि ऊर्जा सचिव उपस्थित होते. मात्र, मुख्यमंत्री मान हेच या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते. यामुळे गदारोळ उडाला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com