नवी दिल्ली : चरणजितसिंग चन्नी (Charanjit Singh Channi) यांनी पंजाबच्या (Punjab) मुख्यमंत्रिपदाची (Chief Minister) धुरा हाती घेतली आहे. चन्नी यांच्या रुपाने पंजाबला पहिला दलित मुख्यमंत्री मिळाला आहे. अतिशय साधेपणाने राहणारे आणि स्वत:ला आम आदमी म्हणवून घेतात. परंतु, मंत्रिपद स्वीकारल्यानंतर 15 दिवसांतच चन्नी हे अडचणीत आले आहेत. राज्याच्या पोलीस महासंचालकांनी घेतलेल्या उच्चस्तरीय बैठकीला त्यांचा मुलगा उपस्थित असल्याचे मोठा गदारोळ सुरू झाला आहे.
राज्याचे पोलीस महासंचालक इकबालप्रीतसिंग साहोटा यांनी नुकतीच एक उच्च स्तरीय बैठक घेतली होती. या बैठकीला मुख्यमंत्री चन्नी उपस्थित होते. पंजाब हे सीमावर्ती राज्य असल्याने राज्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत ही बैठक होती. या बैठकीला चन्नी यांचे पुत्र रिदमजित हेसुद्धा उपस्थित होते. ते पोलीस महासंचालकांच्या मागे बसलेले होते. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे हे फोटो पंजाबच्या जनसंपर्क विभागानेच शेअर केले आहेत. यावरुन मोठा गदारोळ उडाला आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या उच्च स्तरीय बैठकीला मुख्यमंत्र्यांचा पुत्र कसा उपस्थित राहिला, असा सवाल भाजपने केला आहे.
चन्नी यांना मुख्यमंत्रिपदाचा रूबाब आवडेनासा झाल्याचे नुकतेच म्हटले होते. मुख्यमंत्री म्हणून चन्नी यांना दोन कोटी रुपयांची आलिशान कार मिळाली आहे. याचबरोबर त्यांच्याभोवती 1 हजार सुरक्षा कर्मचाऱ्यांचे कडे आहे. यामुळे त्यांना आता कैदेत असल्याची भावना वाटू लागली होती. या सगळ्या गोष्टींची गरज नसल्याची भूमिका त्यांनी घेतली होती. मुख्यमंत्री चन्नी पोलिसांनी त्यांची सुरक्षा कमी करण्याची सूचना केली होती. माझ्या सुरक्षेसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्मचारी नेमणे म्हणजे मनुष्यबळ वाया घालवण्याचा प्रकार आहे. माझ्या जिवाला कोणताही धोका नसून, मी एक सर्वसामान्य माणूस आहे. प्रत्येक पंजाबी नागरिक हा माझा भाऊ आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले होते.
मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांचा शपथविधी नुकताच झाला. चन्नी यांनी शपथ घेतल्यानंतर सुखजिंदरसिंग रंधावा आणि ओ.पी.सैनी यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. पंजाबमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होत आहे. चन्नी यांच्या रुपाने काँग्रेसला पंजाबमध्ये पहिला दलित मुख्यमंत्री मिळाला आहे. जातीय समीकरणे पाहून राहुल गांधींनी दोन उपमुख्यमंत्री देण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्रिपद न मिळाल्याने नाराज नेत्यांना खूष करण्याचा हा प्रयत्न होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.