Video Sandeep Thapar : शिवसेना नेत्यावर पंजाबमध्ये जीवघेणा हल्ला; प्रकृती चिंताजनक

Punjab Shiv sena Leader Sukhdev Sing relative : संदीप थापर यांच्यावर हल्ला झाला त्यावेळी त्यांच्यासोबत पंजाब पोलिसांचा सुरक्षारक्षक होता. त्यानंतरही हल्लेखोरांनी हल्ला केल्याने खळबळ उडाली आहे.
Sandeep Thapar Attacked
Sandeep Thapar AttackedSarkarnama
Published on
Updated on

Chandigarh : शहीद सुखदेव सिंह यांचे नातेवाईक व पंजाबमधील शिवसेनेचे नेते संदीप थापर यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. ते गंभीर जखमी झाले असून प्रकृती चिंताजनक आहे. निहंग वेशातील तिघांनी धारदार शस्त्रांनी थापर यांच्यावर हल्ला केला आहे.

शिवसेना नेते थापर यांच्यावर लुधियानातील शासकीय रुग्णालयासमोरच हल्ला करण्यात आला. हल्लेखोर पळून गेल्यानंतर त्यांना तातडीने याच रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना तातडीने दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले.

थापर हे शुक्रवारी सकाळी शासकीय रुग्णालयातील एका कार्यक्रमासाठी आले होते. तिथे स्कूटरवर जात असतानाच रस्त्यावर निहंग वेशातील तिघांनी त्यांना अडवले आणि धारदार शस्त्रांनी हल्ला केला. त्यापुर्वी थापर यांनी त्यांच्यासमोर हात जोडले होते. पण त्यानंतर हल्लेखोरांनी त्यांच्यावर सपासप वार केले. थापर रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर हल्लेखोर स्कूटर घेऊन पसार झाले.

Sandeep Thapar Attacked
Chandrababu Naidu : चंद्राबाबूंनी दिल्ली पालथी घातली; मोदींकडून ‘गिफ्ट’ मिळणार की पुन्हा निराशा?

गनमन पाहतच राहिला

संदीप थापर हे त्यांच्यासोबत गनमन घेऊन घराबाहेर पडतात. शुक्रवारी त्यांच्या हल्ला झाला त्यावेळीही गनमन सोबत होता. मात्र, हल्ला होत असताना गनमन तिथून निघून गेल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. एक हल्लेखोर त्याला सोबत घेऊन गेल्याचे दृश्य सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे.

Sandeep Thapar Attacked
Santosh Barkade : असेही आहेत आमदार; 50 लाखांचे कर्ज काढून घेतलेली जमीन रुग्णालयासाठी दान, स्वत: राहतात 2 खोल्यांच्या घरात    

थापर यांच्यावर खलिस्तानविरोधी वक्तव्यावरून हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. शेतकरी आंदोलनादरम्यान त्यांनी खलिस्तानविरोधी वक्तव्य केली होती. त्यानंतर त्यांना अनेकदा धमकीही देण्यात आली होती. तेव्हापासूनच पंजाब पोलिसांनी त्यांना सुरक्षा दिली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com