Raghuram Rajan talks about Old Pension Scheme
Raghuram Rajan talks about Old Pension SchemeSarkarnama

Old Pension Scheme News: रघुराम राजन म्हणतात, जुनी पेन्शन योजना धोक्याची

Raghuram Rajan talks about Old Pension Scheme: केंद्र सरकारने 2004 साली जुनी पेन्शन योजना बंद करून नवीन पेन्शन प्रणाली लागू केली होती.
Published on

Old Pension Scheme : भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) माजी गव्हर्नर आणि प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ रघुराम राजन यांनी जुनी पेन्शन योजना (OPS) सरकारी तिजोरीसाठी घातक असल्याचे म्हटले आहे. त्यातून निर्माण होणाऱ्या मोठ्या देण्यांमुळेच ही योजना बंद करण्यात आली. जुन्या पेन्शन योजना एखादा वेळी सरकारी खर्च कमी करेल पण भविष्यातील देणी वाढवेल, असा इशाराच रघुराम राजन (Raghuram Raajan) यांनी दिला आहे.

देशातील सरकारी कर्मचार्‍यांसाठी सध्या लागू केलेल्या नॅशनल पेन्शन सिस्टम (NPS) च्या जागी जुनी पेन्शन योजना परत आणण्याची मागणी जोर धरू लागली आहे. काँग्रेस जुन्या पेन्शन योजनेची बाजू घेत आहे. काँग्रेसशासित राजस्थान, छत्तीसगड आणि हिमाचल प्रदेशने जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू केली आहे.

दावोस येथे सुरू असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी गेलेल्या रघुरामन राजन यांनी एका ऑनलाइन पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत जुन्या पेन्शन योजनेमुळे होणाऱ्या नुकसानीबाबत इशारा दिला आहे.

Raghuram Rajan talks about Old Pension Scheme
Rishi Sunak - Narendra Modi : ऋषी सुनक यांनी ब्रिटिश संसदेत घेतली भारताची बाजू; म्हणाले...

रघुराम राजन म्हणाले की, सध्या लागू केलेली राष्ट्रीय पेन्शन प्रणाली प्रत्येक बाबतीत योग्य आहे. जुन्या पेन्शन योजनेत अनेक त्रुटी आहेत. जी काही राज्ये जुनी पेन्शन योजना स्वीकारत आहेत, त्यांना आगामी काळात अडचणीचा सामना करावा लागू शकतो. सरकारे भविष्यातील देण्याच्या विचार न करता आता जुन्या पेन्शन योजनां अवलंबत आहेत. पण ते त्या राज्यांच्या भविष्यासाठी चांगले नाही.

याच वेळी त्यांनी किरकोळ कर्जाबाबतही इशारा दिला आहे. किरकोळ कर्ज देताना बँकांनी सावध राहण्याचा राहाण्याचा सल्लाही रघुराम राजन यांनी दिला आहे. अलीकडे भारतीय बँकांचा किरकोळ कर्जाकडे अधिक कल आहे. पण आर्थिक मंदीच्या काळात किरकोळ कर्जे धोक्यात येऊ शकतात.

Raghuram Rajan talks about Old Pension Scheme
Old Pension Scheme News : राज्यात जुनी पेन्शन योजना लागू होणार? फडणवीसांचे सूचक वक्तव्य

विशेष म्हणजे जेव्हा भारतीय बँका घाऊक कर्जाच्या तुलनेत किरकोळ कर्जामध्ये मोठी उडी घेऊ पाहत आहेत, त्याच वेळी राजन यांनी ही टिपण्णी केली आहे. इतकेच नव्हे तर, बँकांनी पायाभूत सुविधांना कर्ज देताना त्यातील सर्व जोखमींचे परीक्षण केले पाहिजे. 2007 ते 2009 दरम्यान, आरबीआयने पायाभूत सुविधांच्या कर्जाकडे वाटचाल केली, तरीही नंतर समस्या निर्माण झाल्या, असेही रघुराम राजन यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com