Rahul Gandhi : प्लीज, समजून घ्या..! ट्रम्प प्रकरणात राहुल गांधींना भलताच संशय, मोदींबाबत मोठं विधान

Rahul Gandhi’s Allegation Explained : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सातत्याने टेरिफ वाढविण्याची धमकी देत आहेत. भारताने रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी बंद करावी, असा दबाव ट्रम्प यांच्याकडून टाकला जात आहे.
Rahul Gandhi accusing PM Modi of being restricted by the U.S. Adani investigation in responding to President Trump’s threats.
Rahul Gandhi accusing PM Modi of being restricted by the U.S. Adani investigation in responding to President Trump’s threats. Sarkarnama
Published on
Updated on

बातमीत थोडक्यात महत्वाचे :

  1. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी भारताला २५% टेरिफची धमकी दिली असून, राहुल गांधी यांनी मोदींवर टीका केली आहे.

  2. राहुल गांधी यांनी पोस्टमध्ये उल्लेख केल्याप्रमाणे, “मोदी, AA आणि रशियन ऑइल व्यवहार यांच्यातील आर्थिक संबंध उघडकीस येऊ शकत असल्यामुळे मोदींचे हात बांधले गेले आहेत”.

  3. भारतीय अर्थव्यवस्थेवर ट्रम्प यांच्या टीकेला प्रतिक्रिया देताना सरकारने पाश्चिमात्य देशांवर ‘डबल स्टँडर्ड’चा आरोप केला आहे, मात्र राहुल यांच्या आरोपानंतर राजकीय वातावरण आणखी तापले आहे.

Trump’s Tariff Threats and India-U.S. Trade Tensions : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला पुन्हा टेरिफमध्ये वाढ करण्याची धमकी दिली आहे. आधीच भारताच्या उत्पादनांवर 25 टक्के टेरिफ लावण्यात आले आहे. त्यामुळे आता भारत आणि अमेरिकेमधील तणाव वाढला आहे. तर दुसरीकडे ऑपरेशन सिंदूरवरून ट्रम्प सातत्याने आपणच मध्यस्थी केल्याची विधान करत आहेत. त्यावर पंतप्रधान मोदींनी एकदाही ट्रम्प यांचे नाव घेतलेले नाही.

काँग्रसचे नेते राहुल गांधी यांनी हाच मुद्दा पुढे करत पंतप्रधान मोदींबाबत मोठं विधान केलं आहे. त्यांनी सोशल मीडियात पोस्ट करून पंतप्रधानांवर निशाणा साधला आहे. राहुल यांनी देशवासियांना उद्देशून म्हटले आहे की, कृपया, समजून घ्या. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या सततच्या धमक्यानंतरही पंतपधान मोदी त्यांच्यासमोर उभे राहू शकत नाहीत, यामागचे कारण अदानींविरोधात अमेरिकेतील सुरू असलेली चौकशी हे आहे.

राहुल गांधींनी पुढे म्हटले आहे की, मोदी, AA आणि रशियन तेल करारामधील आर्थिक संबंध उघडकीस आणण्याची एक धमकी आहे. त्यामुळे मोदींचे हात बांधले गेले आहेत, असा निशाणा राहुल गांधींनी सोशल मीडियातून साधला आहे. टेरिफच्या मुद्द्यावर विरोधी पक्षाकडून सातत्याने केंद्र सरकारवर टीका केली जात आहे.

Rahul Gandhi accusing PM Modi of being restricted by the U.S. Adani investigation in responding to President Trump’s threats.
Mahadevi Controversy : मोठी बातमी : माधुरी परत येणार? 'वनतारा'ही जनतेसोबत, मुख्यमंत्र्यांनी दिली महत्वाची अपडेट

ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी भारतीय अर्थव्यवस्थेला मृत अर्थव्यवस्था म्हटले होते. त्यावरून राजकीय वातावरण तापले होते. राहुल यांनीही ट्रम्प यांच्या सुरात सूर मिसळत टीका केली होती. आता त्यांनी थेट मोदींचे हात बांधले गेल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यावरूनही आता राजकारण ढवळून निघण्याची शक्यता आहे.

दरम्यान, अमेरिकेतील गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप उद्योगपती गौतम अदानींवर करण्यात आला होता. मागील वर्षी त्यांच्याविरोधात अमेरिकेत चौकशी सुरू करण्यात आली होती. अदानी यांनी सर्व आरोप फेटाळून लावले होते. या मुद्दायवरून राहुल गांधी प्रचंड आक्रमक झाले होते. विरोधी पक्षातील इतर नेत्यांनीही सरकारला धारेवर धरले होते.  

Rahul Gandhi accusing PM Modi of being restricted by the U.S. Adani investigation in responding to President Trump’s threats.
Mamata Banerjee : अखेर ममतादीदींनी घाव घातलाच; कल्याण बॅनर्जी यांची उचलबांगडी, 2 महिला नेत्यांवर टाकली मोठी जबाबदारी

वारंवार उपस्थित होणारे प्रश्न :

  1. प्रश्न: राहुल गांधी यांनी मोदींवर काय आरोप केला?
    उत्तर: “अदानीविरोधात अमेरिकेतील चौकशीमुळे मोदी ट्रम्पसमोर उभे राहू शकत नाहीत,” असा आरोप त्यांनी केला.

  2. प्रश्न: ट्रम्प भारतावर कोणत्या मुद्यावर टेरिफची धमकी देत आहेत?
    उत्तर: भारताने रशियन तेल व्यापार चालू ठेवल्यामुळे; २५% टेरिफची धमकी आहे.

  3. प्रश्न: भारतीय सरकारने ट्रम्पच्या टीकेला काय उत्तर दिले?
    उत्तर: त्यांनी पाश्चिम देशांनावऱ्यांवर ‘डबल स्टँडर्ड’चा आरोप करत भारताची अर्थव्यवस्था मजबूत असल्याचा दावा केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com