Mamata Banerjee : अखेर ममतादीदींनी घाव घातलाच; कल्याण बॅनर्जी यांची उचलबांगडी, 2 महिला नेत्यांवर टाकली मोठी जबाबदारी

Kalyan Banerjee Resigns as AITC Chief Whip in Lok Sabha : तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी आणि महुआ मोइत्रा यांच्या वाद काही दिवसांपूर्वीच चव्हाट्यावर आला होता. त्यानंतर आता बॅनर्जी यांना चीफ व्हिप पदाचा राजीनामा दिला आहे.
Dr. Kakoli Ghosh Dastidar appointed as the new Chief Whip of the AITC in Lok Sabha following the resignation of Kalyan Banerjee.
Dr. Kakoli Ghosh Dastidar appointed as the new Chief Whip of the AITC in Lok Sabha following the resignation of Kalyan Banerjee. Sarkarnama
Published on
Updated on

Leadership Changes Reflect AITC’s Parliamentary Strategy : तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनजी आणि महुआ मोइत्रा यांच्यातील वाद काही दिवसांपूर्वीच चव्हाट्यावर आला होता. त्यावरून पक्षातही वादळ उठले होते. पक्षाच्या सुप्रिमो व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दोन्ही नेत्यांना तंबी दिल्याची चर्चा होती. पण त्यानंतर आता पक्षांतर्गत मोठी घडामोड घडली आहे.

तृणमूल काँग्रेसमध्ये सोमवारी मोठ्या घडामोडी घडल्या. कल्याण बॅनर्जी यांनी ममतादीदींची भेट घेतल्यानंतर तडकाफडकी लोकसभेतील चीफ व्हीप पदाचा राजीनामा दिला. हा राजीनामा ममता बॅनर्जी यांनी स्वीकारला आहे. पक्षातील दोन नेत्यांमधील वादाचा हा परिणाम असल्याची चर्चा राजकीय वर्तूळात आहे.

संसदेतील खासदारांमध्ये समन्वय नसल्याचा दोष आपल्यावर टाकण्यात आल्याचा आरोप कल्याण बॅनर्जी यांनी केला होता. त्यानंतर आता तृणमूलकडून दोन महिला खासदारांवर महत्वाची जबाबदारी सोपवली आहे. लोकसभेत काकोली घोष दस्तीगीर यांना पक्षाचे चीफ व्हिप तर शताब्दी राय यांना उपनेता बनविले आहे. पक्षाने पहिल्यांदाच एकाचवेळी दोन महिला नेत्यांवर ही जबाबदारी सोपवली आहे.

Dr. Kakoli Ghosh Dastidar appointed as the new Chief Whip of the AITC in Lok Sabha following the resignation of Kalyan Banerjee.
उत्तर काशीतील अंगावर काटा आणणारे थरारक फोटो; माळीणची हृदय पिळवटून टाकणारी घटना आठवेल

तृणमूलने एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, कल्याण बनर्जी यांनी ४ मेला संसदीय दलाच्या चीफ व्हिपचा राजीनामा पक्षाच्या अध्यक्षांकडे दिला आहे. राजीनामा स्वीकारण्यात आला आहे. पक्षातील वरिष्ठ खासदारांच्या सल्ल्याने काकोली घोष यांनी चीफ व्हिप तर रॉय यांना उपनेता बनविण्यात आले आहे.

राजीनाम्यानंतर काय म्हणाले बॅनर्जी?

पदाचा राजीनामा दिल्यानंतर कल्याण बॅनर्जी यांनी म्हटले होते की, काही खासदार संसदेत क्वचितच येतात. ऑनलाईन बैठकीमध्ये दीदींनी (ममता बॅनर्जी) खासदारांमधील असमन्वयाचा ठपका माझ्यावर ठेवला आहे. त्यामुळे मी हे पद सोडण्याचा निर्णय घेतल्याचे बॅनर्जी यांनी स्पष्ट केले.

Dr. Kakoli Ghosh Dastidar appointed as the new Chief Whip of the AITC in Lok Sabha following the resignation of Kalyan Banerjee.
High Court Judge : न्यायाधीश पदासाठीच्या ‘सुप्रीम’ शिफारशीवरून रोहित पवार, काँग्रेसचा मोठा दावा; 'आरती साठे' नावावरून उठले वादळ

पक्षाचे खासदार आपआपसांत भांडत असल्याचे दीदींचे म्हणणे असल्याचे सांगून बॅनर्जी म्हणाले, माझ्याविषयी अपशब्द वापरणाऱ्या खासदारांना मी सहन करायला हवे का? मी पक्षाला याबाबत सांगितले. पण माझा अपमान करणाऱ्या व्यक्तीविरोधात कारवाई करण्याऐवजी मलाच दोषी धरण्यात आले, अशी नाराजीही कल्याण बॅनर्जी यांनी व्यक्त केली आहे.

कल्याण बॅनर्जी आणि महुआ मोइत्रा यांच्यातील शाब्दिक चकमक मागील काही दिवसांपासून सुरूच आहे. दोन्ही नेते सातत्याने एकमेकांवर आरोप करत आहेत. त्यातच आता पक्षाचे नेते अभिषेक बॅनर्जी पुढील दोन दिवसांत दोन्ही नेत्यांची भेट घेऊन समजूत काढणार असल्याचे समजते. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com