

Rahul Gandhi news : कॉक्रोच जनता पार्टीच्या २० जुलैला दिल्लीत झालेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांकडून पॅलेट गनचा वापर करण्यात आल्याचा दावा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी सातत्याने करत आहेत. पॅलेट गनमुळे काही आंदोलक विद्यार्थ्यांना गंभीर जखमा झाल्याचा आरोप करत त्यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. आता याप्रकरणी ते अधिकच आक्रमक झाले आहेत.
कथित पॅलेट गन वापराचा मुद्दा घेऊन राहुल गांधी शुक्रवारी थेट संसद मार्ग पोलीस ठाण्यात पोहोचले. त्यांच्यासोबत एक पीडित विद्यार्थी त्याची आईही आहे. पॅलेट गनमुळे विद्यार्थ्यांना झालेल्या दुखापतीची चौकशी व्हावी आणि गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी त्यांची मागणी आहे. मात्र, आतापर्यंत पोलिसांकडून काहीच हालचाल न झाल्याने त्यांनी पोलीस ठाण्याबाहेरच ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
राहुल गांधी यांच्यासोबत साहिल हा विद्यार्थी असून पॅलेट गनमुळे आपला डोळा आणि शरीरावर ठिकठिकाणी जखमा झाल्याचा आरोप त्याने केला आहे. राहुल गांधींनीही हा मुद्दा लोकसभेतही उपस्थित केला होता. पण केंद्रीय मंत्र्यांकडून हा दावा फेटाळण्यात आला होता. त्यानंतर राहुल यांनी साहिलसोबत पत्रकार परिषद घेतली होती.
पोलिसांनी साहिलची वैद्यकीय तपासणी आणि अन्य पुराव्यांच्या आधारे नेमकी दुखापत कशामुळे झाली आणि त्याला जबाबदार कोण आहे, याचा शोध घ्यावा, अशी मागणी राहुल यांच्याकडून केली जात आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याशिवाय हटणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. अमित शाह यांच्या आदेशावरूनच पॅलेट गनचा वापर करण्यात आला, असा आरोप राहुल यांच्याकडून केला जात आहे. पोलिसांकडून राहुल गांधी यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जात आहे.
साहिल आणि त्याची आई सातत्याने पोलिसांकडे जाऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी करत होते. पण पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे आज राहुल गांधी हे त्यांच्यासोबत पोलिस ठाण्यात आले आणि चौकशीची मागणी केली. साहिलने तक्रार केली असली तरी त्याचा तपास सुरू झालेला नाही. गुन्हाही दाखल नाही. AIIMS कडून वैद्यकीय तपासणी अहवाल देण्यात आलेला नाही. अमित शाह आणि दिल्ली पोलिसांची ही दडपशाही सहन केली जाणार आहे, अशी टीका काँग्रेसकडून करण्यात आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.