Election Commission timing : राहुल गांधींचा बिहारमध्ये एल्गार अन् निवडणूक आयोगानं टायमिंग साधत दिले 'हे' उत्तर...

Rahul Gandhi Bihar rally News : नवी दिल्लीतील राष्ट्रीय मीडिया सेंटरमध्ये निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत राहुल गांधी यांनी केलेले सर्व आरोप फेटाळले आहेत.
Rahul Gandhi affidavit
Rahul Gandhi affidavitSarkarnama
Published on
Updated on

New Dehli News : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी 7 ऑगस्ट रोजी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले होते. निवडणुकीत मत चोरी होत आहे, आणि यात निवडणूक आयोगाचा सहभाग आहे. याचे पुरावे आमच्याकडे असून, हे सर्व भाजपच्या सांगण्यावरून होत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला होता. राहुल गांधींनी एकीकडे बिहारमध्ये एल्गार सुरु केला असतानाच निवडणूक आयोगानं टायमिंग साधले आहे. नवी दिल्लीतील राष्ट्रीय मीडिया सेंटरमध्ये निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत राहुल गांधी यांनी केलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. त्यासोबतच निवडणूक आयोगाला मत चोरीच्या आरोपांचे पुरावे मिळाले नसल्याचे स्पष्ट केले आहे.

यावेळी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी यावेळी सांगितले की, आमच्यासाठी सत्ताधारी किंवा विरोधी पक्ष असा भेद नाही. आमच्यासाठी सर्व राजकीय पक्ष आमच्यासाठी समान आहेत. आमच्यासाठी कोणी सत्ताधारी आहे ना कुणी विरोधी पक्ष. निवडणूक आयोग (Election Commission) राजकीय पक्षामध्ये भेदभाव करीत नाही, असे मत प्रसार माध्यमाशी बोलताना स्पष्ट केले.

Rahul Gandhi affidavit
BJP Politics : वोट चोरीच्या वादात बावनकुळेंचं खळबळजनक वक्तव्य, थेट नागपूर महापालिकेतील भाजपच्या नगरसेवकांचा आकडाच जाहीर केला

त्यासोबतच येत्या काळात नागरिकांनी मतदानाचा अधिकार वापरण्याचे आवाहन केले. त्यासोबतच येत्या 15 दिवसात यंत्रणेतील त्रुटी सांगा, असे आवाहन राजकीय पक्षांना केले आहे. त्यासोबाबतच मत चोरीच्या आरोपांना निवडणूक आयोग घाबरत नसल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी स्पष्ट केले.

Rahul Gandhi affidavit
Yashomati Thakur interview: काँग्रेसला गळती का लागलीय? दोष पक्षाचा की नेत्यांचा? : यशोमती ठाकूर Exclusive

निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेवेळी स्पष्ट केले की, मतदार यादीवर प्रश्न उपस्थित करणे चुकीचे आहे. आयोगाने एका निवेदनात म्हटले की, मतदार यादी तयार करण्याच्या प्रक्रियेत सर्व राजकीय पक्षांचा सहभाग असतो. मात्र, पक्षांच्या बूथ स्तरावरील प्रतिनिधींनी मसुदा यादी नीट तपासली नाही आणि वेळेत आक्षेप नोंदवले नाहीत.

Rahul Gandhi affidavit
BJP Politics : वोट चोरीच्या वादात बावनकुळेंचं खळबळजनक वक्तव्य, थेट नागपूर महापालिकेतील भाजपच्या नगरसेवकांचा आकडाच जाहीर केला

खोट्या आरोपांमुळे घाबरणार नाही

गेल्या काही दिवंप्सून निवडणूक आयोगावर (Election Commission) अनेक आरोप करीत राजकारण केले जात आहे. पण खोट्या आरोपांमुळे निवडणूक आयोग घाबरणार नाही. निवडणूक आयोग भारतातील सर्व मतदारांसोबत आहे. लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय, असंही मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

Rahul Gandhi affidavit
Ajit Pawar leader advice : स्थानिकच्या निवडणुकीमध्ये महायुती विसरून ताकद असल्यास लढा; अजितदादांच्या पक्षाच्या बड्या नेत्याचा सल्ला

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com