Ajit Pawar leader advice : स्थानिकच्या निवडणुकीमध्ये महायुती विसरून ताकद असल्यास लढा; अजितदादांच्या पक्षाच्या बड्या नेत्याचा सल्ला

Maharashtra politics News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बड्या नेत्याने कार्यकर्त्यांना येत्या काळात महायुती विसरून आपली ताकद असल्यास स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारी ठेवा, असा सल्ला दिला आहे.
Ajit Pawar 1
Ajit Pawar 1Sarkarnama
Published on
Updated on

Bhandara News : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका तोंडावर आल्या आहेत. या निवडणुकीसाठी महायुती व महाविकास आघाडी एकत्रीत का स्वबळावर निवडणूक लढणार याची उत्सुकता लागली आहे. त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातच महायुती मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी युती करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, इतर ठिकाणी एकत्रित की स्वबळावर निवडणूक लढणार याबाबत काही ठरलेले नाही. त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बड्या नेत्याने कार्यकर्त्यांना येत्या काळात महायुती विसरून आपली ताकद असल्यास स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारी ठेवा, असा सल्ला दिला आहे.

Ajit Pawar 1
BJP Politics : वोट चोरीच्या वादात बावनकुळेंचं खळबळजनक वक्तव्य, थेट नागपूर महापालिकेतील भाजपच्या नगरसेवकांचा आकडाच जाहीर केला

भंडारा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) कार्यकर्त्यांना संबोधित करताना अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल स्पष्ट सूचना दिल्या आहेत. येत्या काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये ज्याठिकाणी युती होईल त्याठिकाणी युती करायची, असे आमचे धोरण आहे. त्यामुळं युतीचे डोक्यातून काढून टाका, अशा थेट सूचना पटेल यांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.

Ajit Pawar 1
Yashomati Thakur interview: काँग्रेसला गळती का लागलीय? दोष पक्षाचा की नेत्यांचा? : यशोमती ठाकूर Exclusive

येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे. त्यामुळे प्रत्येकाला मतांचा विचार असतो. जिथे आपली ताकद आहे त्याठिकाणी आपण विचार केलाच पाहिजे. गेल्या वेळेस तिथं कोणी जर दुसऱ्याचा निवडून आला असेल तर त्यालाचं जागा सोडायची. आपली ताकद असेल तर आपण लढायचे. त्यामुळे आपणच प्रत्येक प्रभागात आपलाच उमेदवार निवडणूक लढेल या विचारांनाच प्रत्येकाने आता कामाला लागले पाहिजे, असेही खासदार प्रफुल्ल पटेल (Prafull Patel) म्हणाले.

Ajit Pawar 1
Bogus voting allegation : बोगस मतदान, थोरातांच्या आरोपांनी घायाळ विखे संतापले; कोणाचा अपमान करताय? 40 वर्षांचा हिशोब सांगितला

प्रभागात आपल्याकडे सक्षम उमेदवार असेल, दुसऱ्याकडे असेल आणि तिसऱ्याकडेही उमेदवार राहू शकतो. अशा स्थितीत आपल्या कार्यकर्त्याला संधी न देणे, त्याचे मन दुखावणे, हे योग्य वाटत नाही. त्यामुळे जिथे सोयीचे वाटत असेल आपण तिथे बघू, असे म्हणत खासदार पटेल यांनी कार्यकर्त्यांना सूचना दिल्या आहेत.

Ajit Pawar 1
BJP News: वाहतूक पोलिसांचा सीएम फडणवीसांच्या जवळच्या आमदाराला मोठा दणका; नेमकं काय घडलं?

येत्या काळात सर्वच जणांनी एकत्र येऊन काम करण्याची तयारी ठेवा. आपण गफलतीत राहणार नाही, त्यासोबतच त्याठिकाणी आपली ताकद असेल तर आपण लढायचे, अशा सूचना देत खासदार प्रफुल्ल पटेल यांनी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत. ठाकरे बंधू एकत्र आल्याने फरक पडणार नाही

Ajit Pawar 1
BJP Politics : वोट चोरीच्या वादात बावनकुळेंचं खळबळजनक वक्तव्य, थेट नागपूर महापालिकेतील भाजपच्या नगरसेवकांचा आकडाच जाहीर केला

ठाकरे बंधू एकत्र आल्याने फरक पडणार नाही

उद्धव ठाकरे, राज ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे असताना शिवसेनेत एकत्रच होते. वेगळे झाल्यानंतर आता एकत्र आले तर, काय फरक पडणार आहे. एकनाथ शिंदे शिवसेना वेगळी करून लढले आहेत. त्यांच्यासोबत आज अनेक आमदार आहेत आणि परत ते निवडून आलेले आहेत. आता ते दोन एकत्र आले की, वेगळे राहिले तरी काही फरक पडत नाही. जी शिवसेनेची ताकद आहे ती एकनाथ शिंदेंकडे आहे. त्यामुळे येत्या काळात जे काही होईल, ते मतपेटीच्या माध्यमातून लोकांसमोर येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Ajit Pawar 1
Uddhav-Raj Thackeray news : संजय राऊतांनी स्वातंत्र्यदिनाचा मुहूर्त साधला! ठाकरे बंधूंच्या युतीची अधिकृत घोषणा : कुठे कुठे एकत्र लढणार?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com