Yashomati Thakur interview: काँग्रेसला गळती का लागलीय? दोष पक्षाचा की नेत्यांचा? : यशोमती ठाकूर Exclusive

Congress defections News : राज्यातील अनेक नेत्यांनी गेल्या काही दिवसात काँग्रेस सोडली आहे. त्याचे कारणच आता काँग्रेसच्या नेत्या व माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी सांगितले.
Yashomati Thakur
Yashomati ThakurSarkarnama
Published on
Updated on

Pune News : विधानसभा निवडणुकीत महायुतीला जोरदार बहुमत मिळाले. त्यानंतरही भविष्यातील राजकारण डोळ्यासमोर ठेवून महायुतीत मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरु आहे. या इनकमिंगमध्ये काँग्रेसला मात्र मोठे धक्के बसत आहेत. माजी आमदार कुणाल पाटील, संग्राम थोपटे, संजय जगताप, सांगली काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहिलेले पृथ्वीराज पाटील या नेत्यांनी काँग्रेस सोडली. अगदी माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण, माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांची घराणीही भाजपच्या गळाला लागली. राज्यातील अनेक नेत्यांनी गेल्या काही दिवसात काँग्रेस सोडली आहे. त्याचे कारणच आता काँग्रेसच्या नेत्या व माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी सांगितले.

आपल्याला देखील ऑफर होती, असा गौप्यस्फोट यावेळी यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) "सरकारनामाशी" बोलताना केला. ज्या नेत्यांनी चूक केली आहे ते नेते मंडळी ही केलेली चूक झाकून ठेवण्यासाठी भाजपमध्ये जात असल्याचे त्यांनी सांगितले. चुकीच्या गोष्टी केल्यानंतर होणारी कारवाई टाळण्यासाठी महायुतीचा पर्याय शोधला आहे, असा आरोप त्यांनी केला.

Yashomati Thakur
Bachchu Kadu vs BJP minister : फिल्मी स्टाईल जंप : आंदोलनकर्त्याला लाथाडणाऱ्या 'DYSP'चं आता काही खरं नाही!

भाजपने (BJP) गेल्या काही दिवसात सत्तेच्या जोरावर अनेक पक्ष फोडले आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात लढा देण्याची तयारी ठेवल्यास काहीच अडचण येत नाही. अथवा काँग्रेस सोडण्याची वेळ येणार नसल्याचे ठाकूर यांनी स्पष्ट केले.

Yashomati Thakur
Eknath Shinde : 'माझे कुटुंब-माझी जबाबदारी' या भूमिकेमुळेच शिवसेचं नुकसान; मुख्यमंत्री शिंदेंची टीका

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना पक्षाने सर्व काही दिले. त्यांचे वडील शंकरराव चव्हाण यांनी काँग्रेस पक्ष वाढीसाठी खूप प्रयत्न केले. त्यांचे योगदान काँग्रेस पक्ष विसरू शकणार नाही. मात्र, त्यानंतरही पक्षाने दोनवेळा मुख्यमंत्री पदाची संधी दिल्यानंतरही अशोक चव्हाण यांनी हिंदुत्त्ववादी भाजपसोबत जाण्याचा घेतलेला निर्णय पक्षासाठी वेदनादायी होता, असेही ठाकूर म्हणाल्या.

Yashomati Thakur
Congress setback : मनावर दगड ठेवून 45 वर्षांची निष्ठा संपवली, खान्देशात आणखी एका पदाधिकाऱ्याने कॉंग्रेस सोडली..

राजकारणात अनेक ऑफर येतात :

राजकारणात अनेक ऑफर येत असतात. मला कधी व कोणाच्या ऑफर आल्या होत्या, हे सांगण्याची गरज नाही. मात्र राजकारणात आपण एकनिष्ठ राहण्याची गरज आहे. माझे घराणे काँग्रेसशी एकनिष्ठ राहिले आहे. वडील आमदार होते तर आजी देखील राजकारणात होती. त्यामुळे ऑफर आली तरीही मी कधीच काँग्रेस सोडणार नाही. मी काँग्रेस पक्षवाढीसाठी भविष्यात देखील काम करीत राहणार आहे. मी पराभव विसरुन लगेचच पुढच्या निवडणुकीची तयारी करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Yashomati Thakur
NCP Politics : सुरज चव्हाणांच्या नियुक्तीमुळे अजितदादांचं टेन्शन वाढणार, तटकरेंच्या कार्यपद्धतीवर राष्ट्रवादीतील एक गट नाराज

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com