Rahul Gandhi : 'काँग्रेसचे निम्मे नेते भाजपला मिळालेले...कसली लाज', राहुल गांधींनी झाप झाप झापलं

Rahul Gandhi Gujarat Congress Leaders BJP :गुजरात अडकला आहे त्याला बाहेर पडण्याचा मार्ग दिसत नाही. गुजरातीमधील काँग्रेस पक्ष त्याला रस्ता दाखवू शकला नाही. हे मी घाबरून नाही तर लाज वाटून बोलत आहे, असे राहुल गांधी म्हणाले.
Rahul Gandhi
Rahul Gandhi sarkarnama
Published on
Updated on

Rahul Gandhi News : राहुल गांधी गुजरात दौऱ्यावर आहेत. आपल्या दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी त्यांनी 9 तासांत तब्बल 5 बैठका घेतल्या. अहमदाबादमध्ये दोन हजार कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना राहुल गांधी म्हणाले, 'काँग्रेसच्या नेत्यांमध्ये दोन प्रकारचे लोक आहेत. एक जे काँग्रेसच्या विचारधारेशी जोडलेले आहेत. ते जनतेसोबत आहेत. तर, दुसऱ्या प्रकारचे नेत्यांना जनतेशी काहीच देणंघेणं नाही. त्यातील निम्मे भाजपला सामील आहेत.भाजपसाठी काम करणाऱ्यांना पक्षाबाहेर काढणार.',

'माझी पहिली जबाबादारी आहे की काँग्रेसमध्ये जे दोन ग्रुप आहेत ते तोडणे. काँग्रेसमध्ये नेत्यांची कमी नाही. बब्बर शेर सारखे येथे कार्यकर्ते आहेत. मात्र, या काँग्रेस कार्यकर्त्यांना मागून चेनने बांधले आहे. रेसच्या घोड्याला वरातीच्या घोड्यात बांधले आहे.', असे राहुल गांधी म्हणाले.

Rahul Gandhi
Swarget Rape Case Update : दत्ता गाडेला गावात नेले पण 'त्या' दाव्याने पोलिस चक्रावले! दिवसभर शोध मोहीम

'गुजरात अडकला आहे त्याला बाहेर पडण्याचा मार्ग दिसत नाही. गुजरातीमधील काँग्रेस पक्ष त्याला रस्ता दाखवू शकला नाही. हे मी घाबरून नाही तर लाज वाटून बोलत आहे पण मला तुमच्या समोर हे सांगावेच लागेल. राहुल गांधी असो व्वा काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी आम्ही गुजरातला बाहेर पडण्याचा मार्ग दाखवू शकलो नाही.', अशी कबुली राहुल गांधींनी आपल्या भाषणात दिली.

पक्षातील 30-40 लोकांना काढावे लागणार

राहुल गांधींनी आपल्या पक्षातील नेत्यांना कठोर शब्दांत सुनावले की, 'काँग्रेसमध्ये नेत्यांची कमी नाही. जिल्ह्यापासून ब्लॅकपर्यंत काँग्रेसकडे नेते आहेत. मात्र, कार्यकर्त्यांना बांधून ठेवणारे, दोन ग्रुप पाडणारे नेते पक्षाला नको आहेत. गट बनवणारे नेते पक्षाला नको आहेत. पक्षातील 30-40 नेत्यांना बाहेर काढावे लागले तरी आम्ही काढू. बीजेपासाठी आतुन काम करताय तर मग जा आणि बाहेरून काम करा'

काँग्रेसची गुजरातमधील कामगिरी

गुजरात हे पंतप्रधान मोदींचे गृहराज्य आहे. येथे पुन्हा सत्तेत येणे हे काँग्रेसासाठी दिवास्वप्नच राहिले आहे. 2017 मध्ये काँग्रेसने मोठी ताकद लावली होती. 2017 गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने भाजपला चांगली टक्कर दिली होती. मात्र, 2022 च्या काँग्रेसचा दारुण पराभव झाला. 182 जागा असलेल्या विधानसभेत भाजपने तब्बल 156 जागांवर विजय मिळवला. तसेच काँग्रेस फक्त 17 जागांवर विजयी झाली.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

Rahul Gandhi
Swarget Rape Case Update : दत्ता गाडेला गावात नेले पण 'त्या' दाव्याने पोलिस चक्रावले! दिवसभर शोध मोहीम

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com