Nitin Gadkari Threat Case: गडकरींना धमकीचे फोन; जयेश पुजारीचे धक्कादायक खुलासे

Threatening calls to Nitin Gadkari: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील कार्यालयात धमकीचे फोन आले होते.
Threatening calls to Nitin Gadkari News Update
Threatening calls to Nitin Gadkari News Update Sarkarnama
Published on
Updated on

Nagpur News Updates: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Minister Nitin Gadkari) यांच्या नागपूर येथील कार्यालयात धमकीचे फोन आले होते. फोन करणारा हा कुख्यात गुंड जयेश पुजारी उर्फ जयेश कांथा (Jayesh Pujari) बेळगाव तुरुंगात शिक्षा भोगत होता. त्यानंतर नागपूर पोलिसांनी पुजारीला चौकशीसाठी नागपूर येथे आणले. या चौकशीत पुजारीने धक्कादायक खुलासे केले आहेत. (Threatening phone calls to Gadkari; Shocking revelations of Jayesh Pujari)

मिळालेल्या माहितीनुसार, पुजारीला जन्मठेपेची शिक्षा झाली. तो बेळगावच्या तुरुंगात शिक्षा भोगत होता. पण पुजारीला काहीही करुन बेळगावच्या तुरुंगातून बाहेर पडायचं होतं. त्यासाठीच त्याने तुरुंगातून असं काहीतरी करायचं की, दुसऱ्या ठिकाणी गुन्हा नोंद होऊन तिथे नेण्यासाठी पोलिस इथून बाहेर काढतील आणि संधी मिळताच पळून जायचं ,असा त्याचा प्लॅन होता.

Threatening calls to Nitin Gadkari News Update
Tanaji Sawant News : तानाजी सावंतांचं धक्कादायक विधान; म्हणाले,'' बाळासाहेब ठाकरेंना जमलं नाही ते...''

यासाठी त्याने तुरुंगातून पळून जाण्यासाठी गडकरींच्या कार्यालयात फोन करुन धमकी दिली. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. इतकेच नव्हे तर, धमकीचे फोन करण्यामागे आपल्याला प्रसिद्धी मिळवण्याचीही त्याची योजना होती, असेही पुजारीने चौकशीत पोलीसांना सांगितलं आहे.

हत्येच्या दोन प्रकरणात पुजारीला फाशीची शिक्षा झाली होती. पण कमी होऊन त्याला जन्मठेपेची शिक्षा मिळाली आहे. पण आयुष्यभर तुरुंगात राहायचं नाही या योजनेतून तो तुरुंगातून पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. यासाठी त्याने बेळगावच्या तुरुंगातून बाहेर निघण्यासाठी आणि पळून जाण्याची संधी मिळवण्यासाठी, मंत्री गडकरी यांच्या कार्यालयात फोन केल्याची कबूली दिली आहे. तसेच, त्याची अजून चौकशी करण्यात येणार आहे.

दरम्यान, नागपूर पोलिसांच्या एका पथकाने मंगळवारी (28 मार्च) बेळगाव तुरुंगातून जयेश पुजारीचा ताबा घेतला. पुजारीला बेळगावमध्ये अटक झाली होती. नागपूर पोलिसांनी त्याची चौकशी केल्यानंतर या चौकशीत पुजारीने असे खुलासे केले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com