INDIA Alliance March : इंडिया अघाडीचा मोर्चा आडवला, बॅरिकेड टाकले, खासदारांना धक्काबुक्की; राहुल गांधी प्रचंड आक्रमक!

Rahul Gandhi Detained INDIA Alliance March : पोलिसांनी मोर्चा आडवत राहुल गांधी यांना ताब्यात घेतले. त्यावेळी मत चोरीच्या मुद्यावर ते प्रचंड आक्रमक झाल्याचे दिसले.
Rahul Gandhi Detained  INDIA Alliance March
Rahul Gandhi Detained INDIA Alliance March sarkarnama
Published on
Updated on

Rahul Gandhi News : 'मत चोरी'च्या विरोधात इंडिया आघाडीचा मोर्चा संसद भवनापासून निवडणूक आयोगाच्या दिशेने निघाला होता. निवडणूक आयोगाच्या कार्यालयाच्या अलिकडेच पोलिसांनी बॅरिकेट्स टाकून हा मोर्चा अडवला. खासदार अखिलेश यादव आणि काही खासदारांनी बॅरिकेड ओलांडून पुढे गेले. मात्र, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. आंदोलन सहभाग खासदारांसह विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले.

पोलिलांनी मोर्चा अडवत असताना खासदारांना धक्काबुक्की केल्याचा आरोप होत आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या खासदारांना मोठ्या गाडीतून पोलिस ठाण्यात नेले. दरम्यान, पोलिसांच्या ताब्यात असलेल्या राहुल गांधी मत चोरीच्या मुद्यावर प्रचंड आक्रमक झाल्याचे पाहण्यास मिळाले.

राहुल गांधी म्हणाले, 'वास्तव हे आहे की ते चर्चा करू शकत नाहीत. कारण खरं काय ते देशाच्या समोर आले. ही जी लढाई आहे ती राजकीय नाही ही संविधानाची लढाई आहे. संविधान वाचवण्याची लढाई, एक व्यक्ती एक मतची लढाई आहे. त्यासाठी आम्हाला स्वच्छ आणि ओरीजनल मतदानयादी हवी आहे.'

Rahul Gandhi Detained  INDIA Alliance March
Jagdeep Dhankhar House Arrest : 'जगदीप धनखड नजरकैदेत, सुरक्षित नाही...', खासदाराचा 'लेटर बाॅम्ब', दिल्लीत खळबळ!

पोलिसांनी राहुल गांधी, प्रियंका गांधी वाड्रा, संजय राऊत, सागरिका घोष आणि इतरांना खासदारांना ताब्यात घेत पोलिस ठाण्याकडे नेले. दिल्लीचे पोलिस आयुक्त दीपक पुरोहित यांनी सांगितले की, विना परवानगी हा मोर्चा काढण्यात आला होता. खासदारांना धक्काबुक्की केल्याच्या आरोपांमध्ये तथ्य नाही. ताब्यात घेतलेल्या आंदोलकांवर कारवाई होणार आहे.

Rahul Gandhi Detained  INDIA Alliance March
Shashi Tharoor : शशी थरुर निवडणूक आयोगाच्या विरोधातील मोर्चात सहभागी, म्हणाले, राहुलजींचा प्रश्न महत्त्वाचा...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com