Jagdeep Dhankhar House Arrest : 'जगदीप धनखड नजरकैदेत, सुरक्षित नाही...', खासदाराचा 'लेटर बाॅम्ब', दिल्लीत खळबळ!

Sanjay Raut Writes to Amit Shah: उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिल्याच्या संध्याकाळपासून जगदीप धनखड हे गायब आहेत. त्यांच्याशी संपर्क होत नसल्याने खासदार संजय राऊत यांनी थेट गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिले आहे.
 Jagdeep Dhankhar
Jagdeep Dhankharsarkarnama
Published on
Updated on

Jagdeep Dhankhar Mising : उपराष्ट्रपती जगदीप धनखड हे राजीनामा दिल्यापासून गायब आहेत. ते नेमके कुठे आहे? त्यांच्याशी संपर्क होत नसल्याचे खासदार सांगत आहेत. खासदार कपिल सिब्बल यांनी धनखड यांच्या विषयी काळजी व्यक्त केली होती. आता शिवसेना उद्धव बाळासाहे ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी गृहमंत्री अमित शाह यांना पत्र पाठवत जगदीप धनखड कुठे आहेत याची विचारणा केली आहे.

'आपल्या उपराष्ट्रपतींच्या बाबतीत नक्की काय घडले आहे? ते कुठे आहेत? त्यांची तब्येत कशी आहे? ते सुरक्षित आहेत का? देशाला या प्रश्नांची खरी माहिती मिळाली पाहिजे. दिल्लीमध्ये अफवा पसरत आहेत की धनखड यांना त्यांच्या निवासस्थानी नजरकैदेत ठेवण्यात आले असून ते सुरक्षित नाहीत.', असे राऊत यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

राऊत यांनी पत्रात म्हटले आहे की,'राष्ट्रीय सुरक्षा आणि वैयक्तिक स्वातंत्र्याशी संबंधित मी हे पत्र विशिष्ट कारणासाठी लिहित आहे. 21 जुलैला अचानक उपराष्ट्रपतींनी यांनी सायंकाळी सहानंतर प्रकृती कारणास्तव राजीनामा दिल्याची घोषणा झाली. हे ऐकून सर्वांनाच धक्का बसला.पण यापेक्षाही धक्कादायक आणि चिंताजनक बाब म्हणजे 21 जुलैपासून आजपर्यंत आपल्या उपराष्ट्रपतींच्या ठिकाणाबाबत कुठलीही माहिती उपलब्ध नाही.'

 Jagdeep Dhankhar
India Alliance Protest : निवडणूक आयोगावर इंडिया आघाडीचा मोर्चा; 'मत चोरी' विरोधात एल्गार, 300 खासदार, 25 पक्ष रस्त्यावर उतरले!

'ते सध्या कुठे आहेत? त्यांची तब्येत कशी आहे? या बाबींवर कोणतीही स्पष्टता नाही. राज्यसभेतील काही सदस्यांनी त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यात अपयश आले. त्यांच्याशी किंवा त्यांच्या कर्मचाऱ्यांशी कोणताही संवाद साधता आला नाही, ही अत्यंत गंभीर बाब आहे.', असे देखील राऊत यांनी सांगितले आहे.

सुप्रीम कोर्टात जाण्यापूर्वी...

'राज्यसभेतील खासदार तर सर्वोच्च न्यायालयात 'हेबिअस कॉर्पस' याचिका दाखल करण्याचा विचार करत आहेत. कारण आम्हाला धनखड यांच्या ठिकाणाबाबत व त्यांच्या सुरक्षिततेबाबत काळजी वाटत आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या दारात जाण्यापूर्वी मी आपल्याकडून माहिती मागणे योग्य ठरेल असे मला वाटले. आपण माझी भावना समजून घ्याल आणि जगदीप धनखड यांच्या सध्याच्या ठिकाणाबाबत तसेच त्यांच्या सुरक्षितते व प्रकृतीबाबत खरी माहिती द्याल, अशी मला आशा आहे.' असे राऊत यांनी पत्रात नमूद केले आहे.

 Jagdeep Dhankhar
Abu Azmi Rais Shaikh Clash: महाराष्ट्रात समाजवादी पक्षात फुट? अबू आझमी-रईस शेख यांच्यात वाढली दरी

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com