Badlapur News : बदलापूरमधील परिस्थिती कंट्रोलमध्ये आणली, पण पोलिस आयुक्त रविंद्र शिसवे जखमी

Badlapur Rape Case, Railway Police Commissioner Ravindra Shisve : रेल्वे ट्रॅकवरील आंदोलकांना हटवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरच मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आली. यामध्ये 9 ते 10 पोलिस किरकोळ जखमी झाले आहेत.
Badlapur Rape Case, Railway Police Commissioner Ravindra Shisve
Badlapur Rape Case, Railway Police Commissioner Ravindra ShisveSarkarnama
Published on
Updated on

Badlapur School Crime : बदलापुरातील एका शाळेत सफाई कामगाराने दोन चिमुरडींवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्यानंतर संपूर्ण शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.

घटनेतील नराधमाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत शाळा आणि बदलापूर रेल्वे स्थानकात (Badlapur Railway Station) मोठ्या प्रमाणात नागरिकांनी मंगळवारी (ता. 20 ऑगस्ट) सकाळपासून आंदोलन सुरु केले होतं. त्यामुळे कित्येक तास मध्य रेल्वेची वाहतूक खोळंबली होती.

सरकारने आरोपीवर कठोर कारवाई करण्याचं आश्वासन देऊन आणि मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी घटनास्थळी जाऊन योग्य ती कारवाई करण्याचं आश्वासन दिल्यानंतरही आंदोलकांनी रेल्वे ट्रॅक रिकामे केले नाहीत. शिवाय यावेळी आंदोलकांना हटवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरच दगडफेक करण्यात आली. यामध्ये रेल्वे पोलिस आयुक्त रविंद्र शिसवे (Ravindra Shisve) यांच्यासह 9 ते 10 पोलिस किरकोळ जखमी झाले आहेत.

Badlapur Rape Case, Railway Police Commissioner Ravindra Shisve
Devendra Fadnavis Big Action In Badlapur Case: बदलापूर आंदोलनाची धग मंत्रालयापर्यंत; फडणवीसांच्या गृह विभागाची मोठी कारवाई

तर आता हे आंदोलन चिघळवणाऱ्यांची पोलिसांकडून (Police) धरपकड सुरू असून पोलिस तसेच माध्यमांनी काढलेल्या व्हिडिओच्या माध्यमातून आरोपींची ओळख पटवली जात आहे. दरम्यान, स्थानकात रेल्वे रुळांवर उतरलेल्या शेकडो आंदोलकांना हटवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्यानंतर रेल्वे सेवा सुरळीत करण्यात आली. मात्र, पोलिसांवर दगडफेक करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पोलिस आता अॅक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com