

Rahul Gandhi statement : संसदेत किंवा संसदेबाहेर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि भाजप नेत्यांमध्ये नेहमीच टोकाचे आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळतात. आताही संसदेच्या पावसाली अधिवेशनादरम्यान राहुल गांधी यांच्याकडून एनडीए सरकारवर दररोज हल्ला चढविला जात आहे. तर भाजप नेत्यांकडूनही पलटवार केला जात आहे. दिल्लीतील राजकारण तापलेले असतानाच राहुल यांनी भाजपमधील एक नेता आपला फेव्हरिट नेता असल्याचे पहिल्यांदाच उघड केले आहे.
राहुल गांधी यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अत्यंत दिलखुलासपणे हा खुलासा केला आहे. नीट पेपरफुटीनंतर जंतरमंतरवर झालेल्या आंदोलनामुळे देशात सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सर्वच नेते 'जेन झी'सोबत संवाद वाढविण्याचा प्रयत्न करत आहेत. राहुल यांनीही Gen Z शी कनेक्ट वाढविण्यासाठी इन्स्टाग्रामवर विशेष ‘आस्क मी एनीथिंग’ ही मोहीम हाती घेतली आहे.
इन्स्टाग्रामवर विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांना राहुल गांधी यांनी उत्तरे दिली. त्यापैकी एक प्रश्न होता, "भाजपमधील तुमचे आवडते राजकारणी कोण?" राहुल यांनी एका सेकंदात कॅप्टन अमरिंदर सिंग, हे नाव घेतले. कॅप्टन अमरिंदर सिंग हे खूप शांत आणि मनमिळावू स्वभावाचे असून आमचे चांगले जमते, असेहा राहुल म्हणाले.
लष्करी इतिहासाचे अभ्यासक असल्याने ते माझे फेव्हरिट असल्याचे सांगत राहुल यांनी सांगितले. १९६५ मधील भारत-पाकिस्तान युद्ध, लष्करी इतिहास आणि युद्धांवर कॅप्टन यांनी लिहिलेल्या पुस्तकांचा उल्लेखही राहुल यांनी यावेळी केला. शेवटी "हॅलो, अंकल अमरिंदर!", असे म्हणत राहुल यांनी त्यांच्याशी आपले किती जिव्हाळ्याचे आणि कौटुंबिक संबंध आहेत, हे सूचकपणे सांगितले.
दरम्यान, कॅप्टन अमरिंदर सिंग हे पंजाबचे माजी मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्रिपद गेल्यानंतर त्यांनी २०२१ मध्ये काँग्रेसला रामराम ठोकत नव्या पक्षाची स्थापना केला होती. त्यानंतर वर्षभरात हा पक्षच त्यांनी भाजपमध्ये विलीन केला.
विधानसभेच्या निवडणुकीतही त्यांचा पराभव झाला होता. तेव्हापासून ते सक्रीय राजकारणात फारसे दिसले नाहीत. लष्करातील माजी अधिकारी असलेले कॅप्टन आता पुन्हा एकदा आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चेत आले आहेत. त्यांची पुन्हा घरवापसी होण्याची जोरदार चर्चा आहे. यापार्श्वभूमीवर राहुल यांनी त्यांना फेव्हरिट म्हणत संधी साधली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.