Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर मोठे धर्मसंकट; अमित शहांविरोधात दंड थोपटत असतानाच अडकले पेचात

Rahul Gandhi protest Jharkhand : झारखंडमध्ये NEET आंदोलन तीव्र झाल्याने राहुल गांधींसमोर मोठा राजकीय पेच निर्माण झाला आहे. विद्यार्थी हित की मित्रपक्षाचे सरकार, काँग्रेससमोर मोठा सवाल.
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर मोठे धर्मसंकट; अमित शहांविरोधात दंड थोपटत असतानाच अडकले पेचात
Published on
Updated on

Jharkhand students protest : झारखंडमध्ये JPSC (Jharkhand Public Service Commission) आणि JSSC (Jharkhand Staff Selection Commission) भरती परीक्षांमधील कथित गैरप्रकारांविरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन चिघळले आहे. गेल्या 17 दिवसांपासून विविध मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सोमवारी झारखंड विधानभवनाच्या दिशेने मोर्चा काढला.

मात्र, पोलिसांनी आंदोलकांना रोखण्यासाठी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. बॅरिकेट्स हटवून पुढे जाण्याचा प्रयत्न झाल्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज आणि पाण्याचा मारा केल्याचे समोर आले आहे. झारखंडमध्ये

Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर मोठे धर्मसंकट; अमित शहांविरोधात दंड थोपटत असतानाच अडकले पेचात
Student protest : झारखंडमध्ये विद्यार्थी आंदोलन पेटलं! काँग्रेस सत्तेत असलेल्या राज्यात पोलिसांकडून लाठीमार; जंतर-मंतरची पुनरावृत्ती, पाहा नेमकं काय घडलं?

या आंदोलनामुळे काँग्रेससमोरही राजकीय पेच निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखालील झारखंड सरकारमध्ये काँग्रेस सत्तेतील मित्रपक्ष आहे. दुसरीकडे, NEET आणि इतर स्पर्धा परीक्षांमधील कथित गैरप्रकारांवरून काँग्रेस सातत्याने केंद्र सरकारवर निशाणा साधत आली आहे. त्यामुळे झारखंडमधील विद्यार्थी आंदोलनावर काँग्रेसची भूमिका काय असणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

मात्र काँग्रेसने थेट झारखंड सरकारचा बचाव करण्याऐवजी आंदोलक विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दिला आहे. काँग्रेसचे झारखंड प्रभारी के. राजू यांनी विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी पक्ष “पूर्ण ताकदीने आणि एकजुटीने” त्यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले. तसेच काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची भेट घेऊन विद्यार्थ्यांशी चर्चा करण्यासाठी मंत्रीस्तरीय समिती स्थापन करण्याची मागणी केली.

राहुल गांधी यांनीही विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर भूमिका स्पष्ट केली. Instagram वरील ‘Ask Me Anything’ सत्रात ते म्हणाले, “मी डेहरादून आणि कोटा येथे स्पष्टपणे सांगितले आहे आणि अलाहाबादमध्येही सांगणार आहे की आपली शिक्षण व्यवस्था कोलमडली आहे. प्रत्येक सरकारने विद्यार्थ्यांचे ऐकून शिक्षण व्यवस्था बदलण्यासाठी कारवाई केली पाहिजे, मग ते काँग्रेस सरकार असो, केंद्र सरकार असो किंवा झारखंड सरकार असो.”

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीही विद्यार्थ्यांना पाठिंबा देताना म्हटले की, “झारखंड, पंजाब, दिल्ली किंवा इतर कुठेही असो”, काँग्रेस विद्यार्थी आणि तरुणांच्या पाठीशी उभी आहे.

या आंदोलनाच्या केंद्रस्थानी 14 वी JPSC नागरी सेवा परीक्षा आहे. प्राथमिक निकालानंतर कट-ऑफ गुण, गुणवत्ता यादी आणि निकाल प्रक्रियेवर उमेदवारांनी प्रश्न उपस्थित केले. JPSC चे माजी अध्यक्ष एल. खियांगटे यांच्या राजीनाम्यानंतर CID चौकशी, छापे आणि अटकसत्रामुळे प्रकरण अधिक चर्चेत आले.

Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर मोठे धर्मसंकट; अमित शहांविरोधात दंड थोपटत असतानाच अडकले पेचात
Maharashtra Government GR : हायवेलगत अनधिकृत ढाबे-हॉटेल थाटलेत? अतिक्रमण काढण्यासाठी सुप्रीम कोर्टाचा अल्टिमेटम; महाराष्ट्र सरकारने लगेचच GR प्रसिद्ध

JSSC आणि Combined Graduate Level भरती प्रक्रियेतील कथित अनियमिततेवरही विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतला आहे. त्यामुळे पुनर्मूल्यांकन, पारदर्शकता आणि स्वतंत्र चौकशीची मागणी जोर धरत आहे. NEET प्रकरणात केंद्राला घेरणाऱ्या काँग्रेससाठी झारखंडमधील हे आंदोलन विद्यार्थी हित आणि मित्रपक्षाचे सरकार यांच्यातील मोठी राजकीय कसोटी ठरत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com