Rahul Gandhi news : शहांवरील टीकेचा डाव उलटताच राहुल गांधी आपल्याच सरकारवर भडकले; जाहीरपणे चूक सांगत तातडीने तोडगा काढण्याबाबत ठणकावले

Jharkhand police action, student protest India : झारखंड विद्यार्थी आंदोलनावरून राहुल गांधींचा संताप; कोणत्याही राज्यात विद्यार्थ्यांवर बळाचा वापर अमान्य असल्याचे स्पष्ट करत काँग्रेस-जेमएम सरकारला संवाद आणि उपाययोजनेचा सल्ला.
rahul gandhi
rahul gandhisarkarnama
Published on
Updated on

Jharkhand student protest : झारखंडमधील विद्यार्थी आंदोलक आता अधिकच आक्रमक झाले असून त्यांच्याकडून विधानसभेला घेराव घातला जात आहे. यादरम्यान पोलिसांकडून विद्यार्थ्यांवर सौम्य लाठीचार्ज, पाण्याचा मारा करण्यात आला. विद्यार्थ्यांना रोखण्यासाठी तारेचे कुंपण लावण्यात आले होते. पण त्यानंतरही आक्रमक झालेल्या विद्यार्थ्यांनी विधानसभेकडे कूच केले आहे.

दिल्लीतील आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जनंतर काँग्रेस मोदी सरकारविरोधात प्रचंड आक्रमक झाली आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याकडून सातत्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून सभागृहात निवेदनाची मागणी केली जात आहे. त्यातच आता काँग्रेसची सत्ता असलेल्या झारखंडमध्ये विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाल्याने राहुल गांधींची कोंडी झाली आहे.

राहुल गांधी यांनी या लाठीचार्जवर पहिली प्रतिक्रिया देताना सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे. शांतपणे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांसोबतच हिंसा कधीच मान्य केली जाणार नाही, मग ते कोणत्याही राज्यात असो, असे त्यांनी म्हटले आहे. झारखंडमध्ये विद्यार्थ्यांवर बळाचा वापर करणे चुकीचे आहे. विद्यार्थ्यांना शांततेत आंदोलन करण्याचा अधिकार आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

rahul gandhi
Supreme Court Hearing: शिवसेनेच्या सहा खासदारांप्रकरणी ठाकरेंची रणनीती फेल? कोर्टाकडून लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयास तातडीची स्थगिती नाहीच

झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेस आघाडीची सत्ता आहे. या सरकारला सल्लाही राहुल यांनी दिला आहे. चर्चेतून तोडगा निघू शकतो. झारखंड सरकारने या विद्यार्थ्यांचे ऐकून घेत त्यांच्या मागण्यांवर तातडीने तोडगा काढायला हवा, अशी थेट भूमिका राहुल गांधी यांनी घेतली आहे. दरम्यान, भाजपकडून आता राहुल गांधींवर निशाणा साधला जाऊ लागला आहे.

rahul gandhi
Bihar 2009 bypoll : बिहारमध्ये 'एनडीए'ला 17 पैकी 12 जागांवर झटका अन् काही महिन्यांतच विरोधकांना धडकी भरविणारा विजय...

दिल्लीतील लाठीचार्जवर बोलणारे राहुल गांधी झारखंडमधील पोलिसांच्या कारवाईवर बोलणार का, असा सवाल भाजपचे खासदार तेजस्वी सूर्या यांनी केला आहे. त्याचप्रमाणे भाजपच्या इतर नेत्यांनीही राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर टीका केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com