India Alliance update : इंडिया आघाडीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीनंतर पुन्हा वादाची ठिणगी पडली आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केरळचे माजी मुख्यमंत्री पी. विजयन यांच्याविषयी केलेल्या विधानावरून वाद सुरू झाला आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांनी राहुल यांचा उल्लेख थेट 'ईडी एजंट' असा केला आहे. त्यावर काँग्रेसचे नेते के. सी. वेणुगोपाल चांगलेच भडकले आहे.
वेणुगोपाल यांनी सोशल मीडियामध्ये पोस्ट करत राहुल यांच्यावरील टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, चेहरा खराब झाला म्हणून आरसा फोडण्यासारखीच सीपीएमची वक्तव्ये आहेत. राजस्थान असो किंवा तमिळनाडू, राहुल गांधी यांचा फोटो लावून मते मिळविणारे लोक त्यांना ईडी एजंट म्हणत अपमान करत आहेत. स्वतःचे राजकीय अस्तित्वही गमावत चाललेले सीपीएम नेतृत्व राहुल गांधी यांच्या नेतृत्व क्षमतेवर प्रश्न उपस्थित करत आहे.
INDIA आघाडी ही काँग्रेसने पुढाकार घेऊन तयार केलेली व्यापक राजकीय आघाडी आहे. भाजपच्या कथित एकाधिकारशाहीपासून देशातील लोकशाही आणि संविधानाचे संरक्षण करणे, हा या आघाडीचा उद्देश आहे. भाजपला सत्तेपासून दूर करणे या उद्देशाने ही आघाडी निर्माण झाली असल्याचे वेणुगोपाल यांनी सांगितले.
राजकीय विरोधकांना संपवण्यासाठी तपास यंत्रणांचा वापर भाजपकडून केला जातो. त्याविरोधात राहुल गांधी सातत्याने संघर्ष करत असून ते स्वतः अशा कारवाईचे बळीचा बकरा ठरले आहेत. मात्र राष्ट्रीय पातळीवर एकसंध भूमिका न घेता, फक्त राज्यनिहाय प्रादेशिक अजेंडा पाहणारे संकुचित राजकारण सीपीएम करत आहे, अशी टीका वेणुगोपाल यांनी केली आहे.
राहुल गांधींवर आधारहीन आरोप करण्यापेक्षा स्वतःच्या पक्षाच्या घसरणीबाबत आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे, असे प्रत्युत्तर वेणुगोपाल यांनी सीपीएम नेत्यांना दिले आहे. वेणुगोपाल यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे काँग्रेस आणि डाव्या पक्षांमध्ये मोठी दरी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, राहुल यांनी आघाडीच्या बैठकीत केलेल्या भाषणात आपला केरळमध्ये विजयन यांना विरोध असून त्यांची गळाभेट घेऊ शकत नाही, असे विधान केले होते. त्यावरून सीपीएमचे नेते चांगलेच भडकले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.