Flying Kiss Controversy: राहुल गांधींनी महिला सदस्यांकडे पाहून 'फ्लाईंग किस' दिला; स्मृती इराणींचा गंभीर आरोप

Smriti Irani VS Rahul Gandhi: "राहुल गांधींना आता नव्या वादात ढकलून त्यांची पंचाईत करण्याची मोर्चेबांधणी सत्ताधारी भाजप करीत आहे."
Rahul Gandhi News
Rahul Gandhi News Sarklarnama
Published on
Updated on

Loksabha News : मोदी आडनाव बदनामीच्या वादावरून खासदारकी गमावलेल्या पण सुप्रीम कोर्टातून तीच खासदारकी पुन्हा मिळवून लोकसभत आलेल्या राहुल गांधी यांच्यामागे आता 'फ्लाईंग किस'चा भुंगा मागे लागू शकतो. परिणामी मोदी आडनाव प्रकऱणाचे वादल शमले असले तरी राहुल गांधींना आता नव्या वादात ढकलून त्यांची पंचाईत करण्याची मोर्चेबांधणी सत्ताधारी भाजप करत आहे. (Latest Marathi News)

Rahul Gandhi News
Anil Gote News: राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का; अनिल गोटे शरद पवारांची साथ सोडणार?

'फ्लाईंग किस'चा मुद्दा उकरून काढत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी राहुल गांधींना घेरण्याचा प्रयत्न केला आहे. दुसरी बाब म्हणजे लोकसभेत २०१९ सालच्या निवडणुकीत राहुल गांधींना धूळ चारणाऱ्या इराणी पुन्हा राहुल यांच्या विरोधातच नवी मोहीम उघडली आहे.. परिणामी संसदेत मोदी -शहा विरूद्ध राहुल गांधी असा सामना रंगत असतानाच इराणी यांनी आणखी एक नवा मुद्दा पुढे आणला आहे. त्याचे देशभरात राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता आहे? (Rahul Gandhi Flying Kiss Controversy)

काय म्हणाल्या स्मृती इराणी?

स्मृती इराणी संसदेत बोलताना म्हणाल्या, "मी एक गोष्ट सभागृहातच्या समोर आणत आहे. ज्यांनी माझ्या आधी लोकसभेत भाषण केलं (राहुल गांधी) त्यांनी जाता जाता एका विचित्र लक्षणाची प्रचिती दिली. हे एका पुरूषीवर्चस्ववादी विचार असणाऱ्या व्यक्तिकडून असे वर्तन घडू शकते. त्यांनी संसदेच्या सहा महिलांना 'फ्लाईंग किस' दिल्याचा इशारा केला. अशा प्रकारच्या सभ्यता नसलेल्या वर्तनाला या देशाच्या सभागृहात कधीच पाहिलं गेलं नाही. हे कोणत्या कुटुंबाचे लक्षण आहे, हे आज देशाच्या लक्षात आले."

दरम्यान राहुल गांधींच्या संसदेतील भाषणावेळी गोंधळ सुरू होता. सत्ताधाऱ्यांकडून घोषणाबाजी सुरू होती. भाषण संपल्यानंतर गांधी राजस्थानच्या दौऱ्यावर जाणार अशी माहिती होती. त्यावेळी जाताना विरोधकांकडे बघून त्यांनी त्यांनी इशारा केला, त्यांनतर स्मृती इराणी यांनी राहुल गांधींवर हा आरोप केला आहे. गांधीवर केलेला हा आरोप गंभीर स्वरूपाचा आहे.

Rahul Gandhi News
Smriti Irani Challenge To Rahul Gandhi : लोकसभेत पुन्हा खासदार म्हणून आले अन् स्मृती इराणींनी केला राहुल गांधींचा पाणउतारा

बावीस महिलां खासदारांनी तक्रारीचे पत्र :

बावीस महिला सत्ताधारी खासदारांनी याबाबत लोकसभा सचिवालयात पत्र पाठवले आहे. यामुळे राहुल गांधीना 'फ्लाईंग किस' प्रकरण राहुल गांधींना भोवण्याची शक्यता आहे. राहुल गांधींवर कारवाईची मागणी होत आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासून कारवाई करा, अशी भाजप खासदारांची मागणी आहे. 'या बाबतीत तपास करून कारवाई करू, असे सचिवालयातून सांगण्यात आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com