

CJP protest : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याकडून मागील काही वर्षांत सातत्याने विविध घटकांतील लोकांच्या भेटीगाठी घेतल्या जातात. या माध्यमातून त्यांनी राजकारणात आपली वेगळी प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. अशाच एका भेटीतील चर्चेचा संवाद समोर आला आहे. ही भेट होती मोहम्मद इरफान या युवकाची. राहुल यांनी सोमवारी घरी जाऊन त्याची भेट घेतली.
राहुल गांधी आणि इरफान यांच्यातील भेटीची एवढी चर्चा का होतेय? या प्रश्नाचे उत्तर आहे, जंतर मंतर आंदोलनातील इरफानचा व्हायरल झालेला व्हिडिओ. दिल्लीतील रस्त्यांवर विक्रेता म्हणून काम करणारा इरफान जेमतेमच शाळा शिकलाय. मात्र, आंदोलनात त्याने भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना सर्वांसमोर एका दमात बोलून दाखविली. इरफानचा हा व्हिडिओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाला. राहुल यांनाही हा व्हिडिओ भावला.
राहुल गांधी यांच्या भेटीत झालेल्या संवादाची माहिती इरफानने 'लल्लनटॉप'शी बोलताना दिली. या भेटीत इरफानने राहुल यांना तुम्हीही एक ना एक दिवस सत्तेत याल, असे सांगतच कामगार, स्थलांतरीतांच्या भल्यासाठी देशभरात काम करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्याचवेळी राहुल यांना त्याने समोरच सांगितले की, तुम्ही जर आश्वासन पूर्ण केले नाही, तर तुम्हालाही आंदोलनाला सामोरे जावे लागेल.
याविषयी बोलताना इरफान म्हणाला, मी त्यांना स्पष्ट सांगितले की, तुम्ही तर आश्वासन पाळले नाही तर आम्ही तुमच्याविरोधातही रस्त्यावर उतरू. मी कुणाच्याही बाजूने किंवा विरोधात नाही. मला देशाचे भले पाहायचे आहे. देशाची प्रगती होत असेल तर सर्व लोकांना चांगल्या पायाभूत सुविधा मिळायला हव्यात कुणीही वंचित राहू नये, असे इरफान म्हणाला.
दरम्यान, राहुल गांधी यांनी या भेटीची माहिती सोशल मीडियातून दिली आहे. त्यांनी म्हटले होते की, मी इरफानला भेटलो. त्याच्या परिस्थितीपेक्षाही त्याची विचारसरणी खूप वेगळी आहे. इरफानसारखे लाखो तरुण देशासाठी आशादायी आहेत. ते चिकित्सक, संवेदनशील असून आपल्या हक्कांसह कर्तव्यांचीही त्यांना जाणीव आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.