Rahul Gandhi Vs Narendra Modi : होय.. नरेंद्र मोदींना देवानं पाठवलंय! पण कशासाठी...; राहुल गांधींची बोचरी टीका

Lok Sabha Election Phase 7 : ही लढाई विचारधारेची आहे. एकीकडे इंडिया आघाडी आहे, तर दुसरीकडे ते लोक आहेत, ज्यांना संविधान बदलायचे आहे.
Narendra Modi, Rahul Gandhi
Narendra Modi, Rahul Gandhi Sarkarnama

Lok Sabha Election 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मला देवाने पाठवल्याचा दावा केला आहे. त्यावर विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत भाजपसह मोदींवर टीकेची झोड उठवली आहे. पंतप्रधान मोदींच्या या विधानाची काँग्रेस नेते राहुल गांधींनी खिल्ली उडवली आहे. उत्तर प्रदेशातील देवरिया येथील सभेतील गांधीच्या या टीकेमुळे काँग्रेस आणि भाजपमध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. Rahul Gandhi Vs Narendra Modi

राहुल गांधी Rahul Gandhi म्हणाले, आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की त्यांचा जन्म आईवडिलांपासून झालेला नाही. त्यांना एका उद्देशासाठी देवाने पाठवले आहे. होय, ते जे म्हणतात ते अगदी खरे आहे. देवाने त्यांना अदाणी-अंबानी यांच्या मदतीसाठीच पाठवलेले आहे, असा खोचक टोला गांधींनी मोदींना लगावला. तसेच त्यांना खरेच देवाने पाठवले असते तर त्यांनी देशातील गरिब, शेतकरी, मजूर आणि वंचितांसाठी काम केले असते. मात्र त्यांना देवाने सांगितले, की जा आणि अदाणी-अंबानींची मदत करा”, अशी टीका गांधींनी केली आहे.

यावेळी गांधींनी अग्निपथ योजनेवरून मोदींवर निशाणा साधला. पंतप्रधान मोदी Narendra Modi असा दावा करतात, की देशासाठी आपले प्राण देणारे दोन प्रकारचे सैनिक असतील. एक म्हणजे नियमित जवान किंवा अधिकारी, ज्यांच्या कुटुंबाला पेन्शन, दर्जा आणि इतर सर्व फायदे मिळतील. दुसरा गरीब. अग्निवीर नावाच्या या जवानाला 'शहीद'चा दर्जा दिला जाणार नाही. त्याला कोणतेही पेन्शन किंवा इतर लाभ मिळणार नाहीत, असे म्हणत गांधींनी अग्निवीर योजनेचे कागद फाडले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Narendra Modi, Rahul Gandhi
BMC News : 'बीएमसी'त मोठा घोटाळा? मुख्यमंत्री शिंदेंच्या 'ड्रीम प्रोजेक्ट' वादात; कंत्राटदाराने थेट पुरावेच दिले

संविधान बदल्याच्या मुद्द्यावरूनही राहुल गांधींनी मोदी सरकारवर टीका केली. ते म्हणाले, ही लढाई विचारधारेची आहे. एकीकडे इंडिया आघाडी आहे, तर दुसरीकडे ते लोक आहेत, ज्यांना संविधान बदलायचे आहे. भाजपाच्या नेत्यांनी संविधान बदलणार असल्याचे जाहीरपणे सांगितले आहे. मात्र, जोपर्यंत इंडिया आघाडी आणि काँग्रेस आहे, तोपर्यंत आम्ही कधीही असे होऊ देणार नाही, असा दावाही गांधींनी केला.

(Edited by Sunil Dhumal)

Narendra Modi, Rahul Gandhi
Eknath Shinde News : मुख्यमंत्री शिंदे मूळगावी; विश्रांतीसाठी की, विधानसभेच्या प्लॅनिंगसाठी...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com