Eknath Shinde News : मुख्यमंत्री शिंदे मूळगावी; विश्रांती की विधानसभेच्या प्लॅनिंगसाठी..!

CM Shinde at home town Dare : विश्रांतीसाठी आणि शांततेसाठी आपण गावी आल्याचे त्यांनी सांगितले. येत्या 30 तारखेला दरे गावच्या देवस्थानची वार्षिक पूजा आहे, त्या पूजेला ते उपस्थित राहणार आहेत.
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama

Satara Political News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तीन दिवस दरे या त्यांच्या मूळगावी मुक्कामी आले आहेत. त्यांचे मंगळवारी (ता. 28) दुपारी विशेष हेलिकॉप्टरने दरे येथील हेलिपॅडवर आगमन झाले. विश्रांती व शांततेसाठी ते गावी आले असून गावच्या देवस्थानची वार्षिक पूजाही येत्या गुरुवारी होणार आहे. त्या कार्यक्रमासाठीही ते उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले. Eknath Shinde At Dare

गावाविषयी असलेले प्रेम आणि गावातील प्रत्येक कार्यक्रमात सहभागी होण्याचा पायंडा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांनी पाळला आहे. लोकसभेच्या निवडणुकीची धामधूम आता संपली आहे. सर्वांना निकालाची प्रतिक्षा आहे. चार जूनला मतदारांनी कोणाला कौल दिलाय हे समजणार आहे.

तसेच लोकसभेचा निकाल येण्यापूर्वीच महायुतीतील भाजप आणि राष्ट्रवादीत जागांवरून रस्सीखेच सुरू झाली आहे. मात्र शिंदे गट शांत असल्याचे दिसून येते. या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवारी दरे या त्यांच्या मूळगावी तीन दिवस मुक्कामासाठी विशेष हेलिकॉप्टरने दाखल झाले आहेत.

विश्रांतीसाठी आणि शांततेसाठी आपण गावी आल्याचे त्यांनी सांगितले. येत्या 30 तारखेला दरे गावच्या देवस्थानची वार्षिक पूजा आहे, त्या पूजेला ते उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर एक दिवस ते बुलढाण्याला लग्न समारंभाला जाणार आहेत. त्यानंतर ते मुंबईला हेलिकॉप्टरने परत जाणार आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Eknath Shinde
BMC News : 'बीएमसी'त मोठा घोटाळा? मुख्यमंत्री शिंदेंच्या 'ड्रीम प्रोजेक्ट'वर संशयाचं धुकं; कंत्राटदाराने थेट पुरावेच दिले

सध्या लोकसभा निवडणुकीच्या Lok Sabha निकालाची सर्वांना प्रतीक्षा आहे. चार जून रोजी मतदारांनी महायुती की महाविकास आघाडीला कौल दिलाय हे समजणार आहे. त्यापूर्वी मन:शांती मिळविण्यासाठी मुख्यमंत्री दरे गावी मुक्कामी आहेत. गावात आल्यावर शांतता लाभते, असे त्यांचे म्हणणे आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Eknath Shinde
Satara Collector : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर होर्डिंगजबाबत सातारच्या जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली कडक भूमिका!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com