Siddaramaiah Plays Emotional Card in Karnataka Before Election: कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. सर्वच पक्षानी कर्नाटक जिंकण्यासाठी कंबर कसली आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री सिद्धारमैया यांनी प्रचारादरम्यान मतदारांना भावनिक आवाहन केले आहे. देशभरात उन्हाचा तडाखा वाढला असून कर्नाटकमध्ये निवडणुकीमुळे वातावरण तापलं आहे.
म्हैसूर येथील एका रॅलीत सिद्धारमैया मतदारांशी संवाद साधत होते. ते म्हणाले, "या निवडणुकीनंतर मी राजकारण सोडणार आहे," सिद्धारमैया हे वरुणा विधानसभा मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
सिद्धारमैया यांच्या मतदारसंघात बैठका सुरु आहेत. ते मतदारांच्या समस्या जाणून घेत आहेत. युवा, महिला, ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या ते जाणून घेत आहेत. भाजपला ६० पेक्षा जास्त जागा मिळणार नाही, असे त्यांनी सांगितले.
जयदीश शेट्टार आणि लक्ष्मण सावदी यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. यावरुन भाजपचे भविष्य़ काय असेल यांची कल्पना येईल.सिद्धारमैया यांचे नातू दावान राकेश आपल्या आजोबांच्या निवडणुकीत सक्रीय झाले आहेत. ते १७ वर्षांचे आहेत.
भाजपाने ५१ लिंगायत समाजाच्या नेत्यांना तिकीट दिले आहे. २०१८ साली भाजपाने ५५ जागांवर लिंगायत समाजाच्या उमेदवारांना तिकीट दिले होते. ही निवडणूक लिंगायत समाजाचे नेते बीएस येडियुरप्पा यांच्या नेतृत्त्वात लढण्यात आली होती.
भाजपाच्या पहिल्या यादीत येडियुरप्पा यांच्या १२ कट्टर समर्थकांना उमेदवारी देण्यात आली आहे. बीएस येडियुरप्पा यांचे पुत्र बीवाय युजवेंद्र यांच्यासह काँग्रेस आणि जेडीएसकडून प्रलोभन देण्यात आलेल्या १४ लोकांनाही (यामध्ये १२ आमदारांचा समावेश आहे.) भाजपाने यावेळी तिकीट दिले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) कर्नाटक विधानसभा निवडणूक (Karnatak Assembly Election) घड्याळ चिन्हावर लढणार आहेत. पक्षाकडून विनंती केल्यानंतर निवडणूक आयोगाने निर्णय घेतला आहे.
राष्ट्रवादी पक्षाचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेल्यानंतर कर्नाटक निवडणुक कोणत्या चिन्हावर निवडणुका लढणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष होतं. अखेर निवडणूक आयोगाच्या (Election Commission) निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला आहे. हा निर्णय फक्त या निवडणुकीपुरता मर्यादित आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.